शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

पहिल्याच दिवशी ५० हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

पहिल्यादिवशी गोंदिया जिल्ह्यातील ४९ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. २५ हजार ३१७ विद्यार्थी गैरहजर होते. गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १) शाळा सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वर्ग १ ते ४ च्या ११०४ शाळांपैकी १०८७ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील वर्ग १ ते ७ वी च्या १८१ शाळांपैकी १५३ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपिस्थती अधिक राहिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंद होत्या. या शाळांची घंटा १ डिसेंबर रोजी वाजल्याने पहिल्याचदिवशी गोंदिया जिल्ह्यातील १२८५ शाळांपैकी १२४० शाळा सुरू झाल्या आहेत; तर ४५ शाळा पहिल्यादिवशी बंदच होत्या. पहिल्यादिवशी गोंदिया जिल्ह्यातील ४९ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. २५ हजार ३१७ विद्यार्थी गैरहजर होते. गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १) शाळा सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वर्ग १ ते ४ च्या ११०४ शाळांपैकी १०८७ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील वर्ग १ ते ७ वी च्या १८१ शाळांपैकी १५३ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपिस्थती अधिक राहिली आहे. गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातील ५४ हजार ६५० विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली; तर शहरी भागातील २० हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. ग्रामीण भागातील १७ शाळा बंद, तर शहरी भागातील २८ शाळा बंद अशा एकूण ४५ शाळा बंदच राहिल्या आहेत. 

३११ शिक्षक अनुपस्थित- १ डिसेंबर रोजी प्राथमिक शाळा सुरू झाल्याने पहिल्याचदिवशी जिल्ह्यातील ३११ शिक्षकांनी शाळेला दांडी मारली.  गोंदिया जिल्ह्यात ४ हजार ४२३ शिक्षक असून, यापैकी ४ हजार ११२ शिक्षक उपस्थित होते; तर ३११ शिक्षक अनुपस्थित होते. पहिल्यादिवशी दीड वर्षानंतर गुरू आणि शिष्यांच्या भेटी झाल्यात. 

४८ हजार पालकांनी दिले संमतीपत्र- आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमती देणारे पत्र पालकांकडून मागविण्यात आले आहेत. ७५ हजार ६९ विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ६०२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र शाळांना दिले आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ हजार ७६९, आमगाव ४ हजार ३७४, देवरी ६ हजार २८४, गोंदिया ९ हजार ८८२, गोरेगाव ५ हजार ७९, सालेकसा ४ हजार ७६८, सडक-अर्जुनी ३ हजार ८०९, तिरोडा ७ हजार ६३७ पालकांनी संमतीपत्र दिले आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या