शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरीसह विवाहाचा प्रयत्न

By अंकुश गुंडावार | Updated: June 5, 2025 20:21 IST

प्रकरण रामनगर पोलिस ठाण्यात दाखल : लग्न न लावताच पळाला विवाहित तरुण

गोंदिया : एका विवाहित तरुणाने पहिल्या पत्नीकडून घटस्फोट न घेता बालाघाटहून गोंदिया येथे पळून येत दुसऱ्या महिलेसह विवाह करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती तरुणाच्या पत्नीला होताच तिने गोंदिया गाठून विवाह होत असलेल्या ठिकाणी धडक दिली. यामुळे विवाह मंडपात एकच तारांबळ उडाली. यानंतर नरदेव तरुण थेट मंडपातून त्या महिलेला घेऊन पसार झाला. ही घटना बुधवारी (दि.४) गोंदिया येथे घडली. याप्रकरणी पत्नीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार पत्नीचे नाव रश्मी सहारे असून तिच्या पतीचे नाव रमेश सहारे आहे. ती बालाघाट येथील बुढी परिसरातील रहिवासी आहे. तिचा विवाह २१ जानेवारी २०१४ रोजी जोगीलाल सहारे यांचा मुलगा रमेश सहारे याच्यासह सर्व रीतिरिवाजानुसार झाले. लग्नाच्या काही वर्षांनी,माझ्या पतीने आणि त्याच्या नातेवाइकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी माझ्या पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या माध्यमातून मला पोटगी देखील मिळत आहे. माझ्या पतीने घटस्फोटाचा खटला देखील दाखल केला होता तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यानंतर ४ जून २०२५ राेजी माझा पती मला घटस्फोट न देता बालाघाट येथील एका महिलेसोबत गायत्री मंदिर रामनगर येथे लग्न करत असल्याची माहिती मला मिळाली. मी माझ्या नातेवाइकांसह गायत्री मंदिरात पोहचली. तिथे माझे पती रमेश सहारे यांचे नातेवाईक उपस्थित होते. मी तिथे पोहोचल्यानंतर लग्न थांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पतीच्या बहिणींनी करीत होत्या मदत

पत्नी असूनही दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. हे माहिती असून सुद्धा तिच्या नवऱ्याच्या बहिणी दुसऱ्या लग्नासाठी भावाला सहकार्य करीत असल्याचे पत्नीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

"या संदर्भात पीडित महिलेची तक्रार प्राप्त झाली असून तिने तक्रार करताच विवाहस्थळी जाऊन चौकशी केली असता तिथे कुणीच आढळले नाही. तक्रारीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जाईल."- प्रवीण बोरकुटे, ठाणेदार रामनगर पोलिस स्टेशनa

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया