शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! गोंदियात ‘बचपन का प्यार’ला घेऊन तिघांच्या खुनाचा प्रयत्न; तिलाही धमकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 17:48 IST

गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. ती मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन मुलीच्या घरी गेला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देदोनजण गंभीर जखमी, नागपूरला हलविले दोन गटांतील सात जणांवर गुन्हा दाखल : तीन अल्पवयीन

गोंदिया : गोंदियात एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली आहे. १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात वेडा झाला. परंतु, ती बोलत नसल्याने त्याचा राग अनावर झाला व त्याने थेट तिचे घर गाठत तिला तिच्या कुटुंबियांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तिच्या आईने नातेवाइकांना मदत मागितली असता, त्याने दोन नातेवाइकांवर चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. तर मुलीच्या नातेवाइकांनी दुसऱ्या गटातील एकावर चाकूने हल्ला केला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यातील दोन गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. ही थरारक घटना २४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडली.

गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो मुलगा आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन त्याने २४ एप्रिल रोजी रात्री मुलीचे घर गाठले. तू माझ्याशी बोलली नाही तर तुला चाकूने मारून ठार करील, अशी धमकी दिली. यावर धास्तावलेल्या मुलीच्या आईने ओळखीचे व नातेवाईक असलेल्या लोकांना सांगितले.

यात नातेवाईक आल्यावर दोन्ही गटांत वाद झाला. यात माताटोली राजेंद्र वाॅर्ड श्रीनगर येथील अभिषेक उर्फ जादू प्रेमलाल वर्मा (१८) याने परमानंद देवानंद नागभिडे (२६, रा. गौतमनगर, गोंदिया) व धर्मराज बावनकर (२८) या दोघांना चाकूने मारून खुनाचा प्रयत्न केला. तर परमानंदच्या गटातील लोकांनी अभिषेक उर्फ जादू प्रेमलाल वर्मा (१८) याला चाकूने मारून त्याच्याही खुनाचा प्रयत्न केला. या वादात तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यातील जखमी परमानंद नागभिडे व धर्मराज बावणकर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. अभिषेक वर्मा याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. दोन्ही गटांतील व्यक्तींवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात पैकी तीन विधी संघर्षित बालके

तिहेरी खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणात दोन्ही गटांतील सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सात पैकी तीन विधिसंघर्षित बालके आहेत. त्यातील एक श्रीनगर, दुसरा पैकनटोली तर तिसरा भीमनगरातील आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया