शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:15 IST

गोंदिया तालुक्यातील ग्राम धामनेवाडा येथील ग्रामपंचायत निकालात विजेत्या उमेदवारांना पराभूत दाखविण्यात आले.

ठळक मुद्देधामनेवाडा येथील प्रकरण : ग्रामपंचायतला ठोकले नाही कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गोंदिया तालुक्यातील ग्राम धामनेवाडा येथील ग्रामपंचायत निकालात विजेत्या उमेदवारांना पराभूत दाखविण्यात आले. प्रकरणी अधिकाºयांकडून न्याय न मिळाल्याने विजयी उमेदवार व गावकºयांनी गुरूवारी (दि.९) ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. गावकºयांचा रोष बघता संबंधीत अधिकाºयांनी प्रकरणाची चौकशी करुन न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने गावकºयांनी आपले आंदोलन मागे घेत ग्रामपंचायला कुलूप ठोकले नाही.जिल्हाधिकाºयांच्या यादीत दोन पराभूत उमेदवारांना विजयी तर विजयी उमेदवारांना पराभूत दाखविण्याची दुर्दैवी घटना धामनेवाडा येथे घडली होती. या प्रकारामुळे विजयी उमेदवार व त्या वॉर्डातील वातावरण तापले होते. प्रकरणी ्न्याय मिळावा याकरिता विजयी उमेदवार व गावकरी तहसीलदारांच्या भेटीसाठी ही आले होते. मात्र तहसीलदार सुटीवर गेल्याने गावकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या देत गुरूवारी (दि.९) सरपंच पदभार व उपसरपंचांची निवड प्रक्रीया होऊ देणार नाही व ग्रामपंचायतला कुलप ठोकणार असल्याचा इशारा दिला होता.त्यानुसार गुरूवारी (दि.९) उमेदवार व गावकºयांनी कुलूप ठोकण्याची तयारी केली. हा प्रकार थांबविण्याकरीता पोलीस यंत्रणा सज्ज झाली व अतिरीक्त पोलीस तुकडी बोलविण्यात आली होती. या दरम्यान नायब तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधकिारी वाहने, लिपीक कटरे, पोलीस निरीक्षक शितल जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन प्रकरणाचा तपास सुरु असून सत्य समोर येताच न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले.तर उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी भ्रमणध्वनीवरून महेंद्र भदाडे व मालता कोकुडे यांच्यावर अन्याय झाला असेल तर निश्चितच न्याय मिळवून देवू असे आश्वस्त करुन आंदोलन न करण्यास सांगीतले. अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर विजयी उमेदवार भदाडे व कोकुडे यांच्यासह राजू टेकाम, सोनू तिडके, रामेश्वर कटरे, गजू उईके, जोगेश्वरी रिनाईत, वनमाला जगणित, ममता मेश्राम, देवराज भदाडे सहीत उपस्थित शेकडो नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतला कुलूप ठोको आंदोलन मागे घेतले.