शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

गोंदियात लाचेची मागणी करताना सहायक निबंधक अडकला; एक लाख रुपयांची केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:09 IST

Gondia : मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द केल्याने त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून २२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा सहायक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द केल्याने त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून २२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा सहायक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई गोंदिया येथे मंगळवारी (दि. २८) नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) केली. सुदाम लक्ष्मण रोकडे असे लाचेची मागणी करणाऱ्या सहायक निबंधकाचे नाव आहे.

तक्रारदाराचा मासेमारी व्यवसाय आहे. त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या., रामनगर रजि. नं. ६६८ या संस्थेसोबत उत्पादित मासे खरेदी-विक्रीचा करारनामा केला. हा करारनामा कालावधी सन २०२३ ते २०२७ दरम्यानचा आहे. काही कारणास्तव संस्थेने त्यांचा करारनामा मुदतपूर्व रद्द केला. याबाबत तक्रारदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य भंडारा यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवर चौकशी करण्याकरिता सहायक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे (वय ५६) सहकारी संस्था गोंदिया तथा अतिरिक्त प्रभार सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य) भंडारा याने तक्रारदाराला यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली.

मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार एसीबीकडे केली. या लाचमागणीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने ९ ऑक्टोबर २०१६ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या सापळा पडताळणी दरम्यान सुदाम रोकडे यांनी तक्रारीची चौकशी करण्याकरिता तक्रारदाराला एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता २५ हजार रुपयांपैकी २२ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. २८ ऑक्टोबर रोजी लाचेच्या सापळ्याचा संशय आल्याने रोकडे यांनी मागणी केल्याप्रमाणे लाच रक्कम स्वीकारली नाही.

सदर लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई

पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, राजकिरण येवले, पोलिस हवालदार अश्मिता भगत, पोलिस शिपाई हेमराज गांजरे, पो. शि. होमेश्वर वाईलकर, प्रफुल भातुलकर, चालक पोशि. राजेंद्र जांभूळकर यांनी ही कारवाई केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gondia Assistant Registrar Arrested for Demanding Bribe of One Lakh

Web Summary : Assistant Registrar in Gondia caught demanding ₹1 lakh bribe for inquiry. He was ready to accept the first installment of ₹22,000. Anti-Corruption Bureau laid the trap, arresting Sudam Rokde. A case has been registered against him.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार