शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 22:42 IST

प्राप्त माहितीनुसार येथील नगर परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये लेखापाल पदावर कार्यरत मुकेश नायक व सचिव राजा नायक यांच्यात आपसी वाद आहे.

गोंदिया : नगर परिषद कर्मचारी सोसायटीमधील वादाला घेऊन सोसायटीमध्ये कार्यरत एका कर्मचाऱ्याने सोसायटी संचालक व प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजतादरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार येथील नगर परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये लेखापाल पदावर कार्यरत मुकेश नायक व सचिव राजा नायक यांच्यात आपसी वाद आहे. यातच मुकेश नायक यांनी सोसायटीमध्ये यापुर्वीही काही वाद घातला होता व त्यावर त्याला २० फेब्रुवारी रोजी कामावरून कमी करण्यात आले. यावर त्याने गुरूवारी (दि.५) दुपारी सोसायटीमधील सर्व कर्मचाºयांना बाहेर काढून सोसायटी कार्यालयाला कुलूप ठोकले.

यावर सोसायटी संचालक व प्रभारी अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले होते. यावर नायक याने सायंकाळी ७ वाजतादरम्यान अग्निशमन कार्यालयात जाऊन भेंडारकर यांना संचालक पदाचा राजीनामा देण्यास सांगत धक्काबुक्की केली. तसेच भेंडारकर पोलिसांत तक्रार देण्यास आले असता तेथे त्यांना मारहाण केल्याचे भेंडारकर यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. प्रकरणी मुकेश नायक तसेच भेंडारकर यांनी एकमेकांविरोधात तक्रार दिल्याची माहिती आहे. या प्रकरणाला घेऊन शुक्रवारी (दि.६) नगर परिषद कार्यालय बंद राहणार अशा चर्चा सुरू होत्या.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र