शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विद्येच्या मंदिर परिसरातच तब्बल ७८१ पानटपऱ्या; तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:21 IST

सर्वेक्षणानंतर बाब आली उघडकीस : दंडात्मक व फौजदारी कारवाई होणार

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शालेय मुलांना खर्रा, गुटखा, तंबाखूचे व्यसन जडले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाळेच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात सुरू केली आहे. जिल्ह्यातील शाळांच्या १०० मीटर व २०० मीटर परिसरात किती पानटपऱ्या आहेत याचे सर्वेक्षण पोलिस विभागाने केल्यावर शाळा परिसरातच तब्बल ७८१ पानटपन्या असल्याची बाब पुढे आली आहे.

महिनाभरापासून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शालेय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होऊ नये यासाठी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. 

शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही जिल्हा परिषद शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वत्रच गुटखा खुलेआम विक्री केला जात आहे. 

शाळांच्या १०० मीटर परिसरात ४१७, तर २०० मीटर परिसरात ३६४ पानटपऱ्या असल्याची बाब पुढे आली आहे. आता या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिस विभागाने सुरू केली आहे. 

आता दंडात्मक कारवाई, न ऐकल्यास फौजदारी शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटरच्या परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ कोणी विक्री करीत असेल, तर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालक, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची आहे. थेट विक्रेत्याला बोलण्याऐवजी पोलिसांची मदत घेऊन कारवाई केल्यास भविष्यात मुले व्यसनी होणार नाहीत.  यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. सुरुवातीला २०० रुपये दंड करून सोडले जात आहे. दंड केल्यानंतरही विक्री सुरूच ठेवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. - गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया

जिल्हा पोलिसांची १२६ पानटपरी चालकांवर कारवाई गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत १२६ कारवाया करण्यात आल्या आहेत. दररोज कारवाया करणे सुरूच आहे. यात सर्वाधिक कारवाया गोंदिया शहर पोलिसांनी केल्या आहेत. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाTobacco Banतंबाखू बंदी