शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच ट्रकमध्ये कोंबले तब्बल १२० विद्यार्थी, १० पडले बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 08:06 IST

मुख्याध्यापक व सहायक शिक्षक निलंबित; मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.

गोंदिया : क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तब्बल १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबण्यात आले. यामुळे काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन १० विद्यार्थी बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत रविवारी अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व सहायक शिक्षकाला निलंबित केले आहे. 

सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथे आश्रमशाळांच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते. यासाठी मजितपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या १२० विद्यार्थ्यांना शनिवारी एकाच ट्रकमधून नेण्यात आले. दोन-तीन वाहनांची गरज असताना मुख्याध्यापकांनी सर्व १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमधून नेण्यास सांगितले.

रात्री ९ वाजताच्या सुमारास  विद्यार्थी त्याच ट्रकमधून परत येत असताना अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. १० विद्यार्थी बेशुद्ध पडले. ट्रकमध्ये असलेल्या शिक्षकाने चालकाला गाडी जवळच्या एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. तेथे बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र शिवाणी चुलपार, पूनम वट्टी, भुनेश्वरी उईके या तीन विद्यार्थिनींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना गोंदियाच्या शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिन्ही विद्यार्थिनींची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मुख्याध्यापक एस. के. थुलकर व सहायक शिक्षक एन. टी. लिल्हारे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल या घटनेची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले. 

पैसे वाचविण्यासाठी खटाटोप मुख्याध्यापकाने प्रवास भाड्याचे पैसे वाचविण्यासाठी १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमधून ७० किमीच्या प्रवासाला नेऊन एकाप्रकारे त्यांच्या जिवाशी खेळच केला. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर पालकांनी संताप व्यक्त केला. आ. विजय रहांगडाले यांनी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.  

विद्यार्थ्यांची बेजबाबदारपणे वाहतूक, जबाबदारीचे योग्यरितीने पालन न करणे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मुख्याध्यापक आणि जबाबदार शिक्षकावर पुढील कारवाई केली जाईल. विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी.

टॅग्स :Studentविद्यार्थी