सिव्हिल लाईन्समध्ये मूर्तीकारांचे झाले आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:33+5:30

कुंभारांचा परिसर व मुर्तींसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तींची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत असतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तीकार येत असून यंदाही मूर्तीकारांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हनुमान चौकापासून या मूर्तीकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मूर्ती तयार करतात.

The arrival of sculptors in the Civil Lines | सिव्हिल लाईन्समध्ये मूर्तीकारांचे झाले आगमन

सिव्हिल लाईन्समध्ये मूर्तीकारांचे झाले आगमन

Next
ठळक मुद्देगोंदियातली चितारओळ पुन्हा गजबजली, मूर्ती घडविण्यास झाली सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या ११ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मुर्तीकार आपले बस्तान मांडतात. त्यानुसार, यंदाही मुर्तीकारांच्या परिवारांचे आगमन झाले असून त्यांनी मूर्ती बनविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा गोंदियातली चितारओळ गजबजली आहे.
कुंभारांचा परिसर व मुर्तींसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तींची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत असतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तीकार येत असून यंदाही मूर्तीकारांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हनुमान चौकापासून या मूर्तीकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मूर्ती तयार करतात. त्यानुसार यंदाही मुर्तीकारांचे आगमन झाले असून त्यांनी मूर्ती तयार करण्यास सुरूवात केली आहे.
हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मूर्तीपूजेलाही तेवढाच मान आहे. यंदा ११ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असून तेव्हापासूनच मूर्तीपूजनाचे सण सुरू होत आहेत. तर २२ ऑगस्ट रोजी गणपती स्थापना येत असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाभाई, लक्ष्मीपूजन सारखे सण येतील. त्यामुळे हे मूर्तीकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मूर्ती बनविण्यास सुरूवात केली आहे.
मोठ्या संख्येत मूर्तीकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते माता मंदिर चौक हा परिसर जणू चितारओळ म्हणूनच प्रसिद्ध झाला आहे.

गणरायाच्या मूर्ती बनविण्यास सुरूवात
मूर्तीपूजनाच्या सणांत सर्वप्रथम जन्माष्टमी येते व त्यानंतरच अन्य मूर्तीपूजनाचे सण येतात. येत्या ११ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी येत असल्याने मूर्तीकार कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे, कृष्णाच्या तुलनेत गणपतीचे ऑर्डर जास्त राहत असल्याने ते कृष्णाच्या मृर्ती बनविण्यासोबतच गणरायाच्या मूर्ती बनवित आहेत.

Web Title: The arrival of sculptors in the Civil Lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ganpatiगणपती