शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

एकाच जागी केली १०० जणांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

२२ मार्चला प्रधानमंत्री यांच्या आवाहनावरून जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.दरम्यान रेल्वे गाड्यांचे येणे-जाणे बंद करण्यात आले होते. राज्य परिवहन निगमच्या बसेस व खासगी वाहन सेवा बंद करण्यात आली. काही गाड्या सुरू होत्या.त्यामुळे ते गोंदियापर्यंत आले होते. परंतु त्यांना आपल्या घरी जाण्याचे साधन उपलब्ध झाले नाही. या लोकांची दखल २४ मार्चला जिल्हा प्रशासनाने घेतली.

ठळक मुद्देप्रशासनाकडूनच नियमांचे उल्लघंन : म्हणे वेगळ्या ठिकाणी करणार व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाहेरून जिल्ह्यात परतलेले लोक येथे अडकले. जिल्हा प्रशासनाने त्यांची मनोहर म्युनिसीपल हायस्कूल येथे नेऊन त्यांना ठेवले. एकाच ठिकाणी १०० पेक्षा अधिक लोकांना ठेवण्यात आले. परंतु त्यांच्यासाठी काही साधन उपलब्ध करण्यात आले नाही. प्रशासन आपल्या नियमाचे उल्लघंन करताना दिसत आहेत.२२ मार्चला प्रधानमंत्री यांच्या आवाहनावरून जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.दरम्यान रेल्वे गाड्यांचे येणे-जाणे बंद करण्यात आले होते. राज्य परिवहन निगमच्या बसेस व खासगी वाहन सेवा बंद करण्यात आली. काही गाड्या सुरू होत्या.त्यामुळे ते गोंदियापर्यंत आले होते. परंतु त्यांना आपल्या घरी जाण्याचे साधन उपलब्ध झाले नाही. या लोकांची दखल २४ मार्चला जिल्हा प्रशासनाने घेतली. जिल्हा प्रशासनाने अश्या व्यक्तींसाठी मनोहर म्युनीसीपल स्कूलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. २४ मार्चला सायंकाळी ७५ जणांना या ठिकाणी ठेवण्यात आले. २५ मार्चला पुन्हा ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांची संख्या १०० च्या वर गेली आहे. यात बाहेरून येणारे व घरी न जाऊ शकणारे, तसेच रेल्वेस्थानकाच्या परिसरात आपले घर बनविणाऱ्यांचा समावेश आहे.या ठिकाणचे निरीक्षण केल्यावर कोणतीच व्यवस्था उपलब्ध नव्हती. पाणी पिण्यासाठी फक्त एक ड्रम होता. साबणाची व्यवस्था नव्हती. १०० पैकी एकाही व्यक्तीने आंघोळ केली नव्हती. विचारपूस केल्यावर कसलीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.बहुतांश लोकांकडे मास्क नव्हते. काहींनी मास्क स्वत: खरेदी केले. संपूर्ण परिसरात सॅनिटायझर करीता काही प्रयत्नच करण्यात आले नाही. परिस्थितीमुळे अडकलेले लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून आपला कसा बचाव करतील. शाळा परिसरातील मोटार बिघडली. वायर जळल्याने ही स्थिती आली.या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी परीवेक्षाधिन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी ती मोटार दुरूस्ती करण्याचे आदेश दिलेत. परंतु बातमी लिहीपर्यंत व्यवस्था झाली नव्हती. २४ मार्चच्या सायंकाळी श्री टॉकीजच्या चौरसिया ग्रुप,५ मार्चला दुपारी जैन फ्रूटकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कुणी जर व्यवस्था करायला पुढे येत नसले तर आम्ही व्यवस्था करण्यास पुढाकार घेऊ असे नितेश जैन, नवीन जैन, संदीप जैन यांनी सांगितले.प्रत्येकाला वाटते घरी पोहचावेबालाघाट जिल्ह्याच्या लालबर्रा तालुक्याच्या देवरी येथील पुरूषोत्तम जगन्नाथ विवाह समारोहात कारागीर म्हणून काम करतात. ते एका लग्नाच्या पार्टीत काम करायला आले होते तर ते अडकले. रायपूर येथील विनोद भोयर कॅटरिंगच्या कामासाठी आले होते. आणि ते सुध्दा इथेच अडकले. वडसा येथील विजय उमरे रायपूरमध्ये काम करायला आले होते. ते सुध्दा पत्नी व दोन वर्षाच्या मुलीला घेऊन गावाला जाण्यासाठी गोंदियात आले होते. परंतु त्यांच्या भाग्यात शाळेत राहण्याची वेळ आली. तेंदूपत्तावरून परतणाºया कालीमाटी येथील रामदास गौतम,रायपूरवरून परतलेले बालाघाट जिल्ह्याच्यासांढरा येथील अशोक सुलाखे व इतर लोकांना ते आपल्या घरी कधी परततील अशी चिंता त्यांना आहे.आता लोकांना आणून ठेवले आहे. त्यांची व्यवस्था करायला वेळ लागेल. या ठिकाणावरून इतर दोन-तीन शाळेत त्यांना नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा केल्या जातील.-वंदना सवरंगपते, उपविभागीय अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस