शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:13 IST

मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे.

ठळक मुद्दे१० लाखावर नुकसान : अनेक मार्ग बंद,

खांबी पुलावर बस बंद पडलीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी (दि.२१) सकाळी खांबी नाल्यावर अचानक बस बंद पडली होती, मात्र गावकऱ्यांच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.सोमवारी (दि.२०) दुपारी अचानक मेघ दाटून आले. रिपरिप पावसाला सुरुवात झाली. मात्र दुपारी पाऊसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास पावसाने चांगलेच झोडपले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ११७ व सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३३ मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस येत होते. मात्र रात्रभर रिपरिप सुरुच होती. खांबी नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने खांबी-बोंडगावदेवी मार्ग बंद होता. शाळकरी विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. खामखुरा-महागाव व बोरी-मांडोखाल हे रस्ते अजूनही बंदच आहेत. सोमवारी सायंकाळपासून इटखेडा-महागाव, मोरगाव-निलज व खैरी-गोठणगाव मार्गावरची वाहतूक बंद होती. ती मंगळवारी सकाळी सुरु झाली.अर्जुनी-मोरगाव येथील अनेक प्रभागात अजूनही पाणी साचलेले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार घरे पूर्णत: पडली तर १६६ घरे अंशत: व ८ गोठ्यांना नुकसान पोहचले आहे. एकूण नुुकसान १० लाखाचे वर झाले आहे. मालकनपूर येथील हेमराज पाडूरंग मेश्राम यांच्या घराजवळ असलेली सार्वजनिक विहिर खचली आहे.त्यामुळे मोठा खड्डा पडला असून याठिकाणी धोक्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतापगड, महागाव व इटखेडा रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे सोमवारी रात्री वाहतूक बंद होती. त्यामुळे महाराज्य राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्जुनी-मोरगाव येथील बसस्थानकावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.अन् बस पुलावर बंद पडलीमंगळवारी सकाळी ६.३० ते ७ वाजताचे दरम्यान साकोली-अर्जुनी मोरगाव मार्गे खांबी ही बस खांबी पुलावर आली. पुलावर काही प्रमाणात पाणी होते. चालकाने पुलावर बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक तांत्रिक बिघाड आल्याने ती पुलावरच बंद पडली. पुराचे पाणी वाढत होते. पावसाची रिपरिप सुरुच होती. उपस्थितांनी खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर यांना भ्रमणध्वनीवर सूचना दिली. त्यांनी लगेच ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टरला दोरखंड बांधून बसला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता. खांबी येथील गावकºयांच्या सहकार्यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर