शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

खोडशिवणी परिसरातील दोन पुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST

गोंदिया : खजरी ते खोडशिवणी दरम्यान असलेल्या चूलबंद नदीवरील दोन पुलांच्या बांधकामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. ...

गोंदिया : खजरी ते खोडशिवणी दरम्यान असलेल्या चूलबंद नदीवरील दोन पुलांच्या बांधकामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या पाठपुराव्याला प्रदीर्घ काळानंतर यश आल्याने त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे आभार मानले.

गोंदिया - कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३वर खजरी हे गाव आहे. या गावापासून ५ किमी अंतरावर खोडशिवणी गाव आहे. हा इतर जिल्हा मार्ग क्र. ८४ असून, पुढे खोडशिवणी - गिरोला - साकोली असा आहे. खोडशिवणी या गावाला जाण्यासाठी पूर्वी रस्ताच नव्हता. खा. पटेल हे प्रथम खासदार झाले तेव्हा गंगाधर परशुरामकर यांच्या आग्रहावरून त्यांनी रस्ता बांधकामासाठी प्रयत्न केले व हा रस्ता तयार झाला. या रस्त्यावर बोथली ते म्हसवाणी तसेच म्हसवाणी ते खोडशिवणी दरम्यान चूलबंद नदीवरील दोन छोटे पूल आहेत. पावसाळ्यात या पुलांवर पाणी राहात असल्याने वाहतूक बंद होत होते. गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात रमेश शुक्ला हे कार्यकारी अभियंता असताना खासदार पटेल यांच्या सूचनेवरून त्यांनी दोन पुलांचे प्रस्ताव तयार केले होते. तेव्हा दोन्ही पुलांसाठी केवळ बारा लाखांचा निधी मंजूर झाला होता. पर्याप्त निधी उपलब्ध झाला नसल्याने दोन्ही ठिकाणी रेज कॉजवे बांधण्यात आले होते. आजही ते कायम आहेत. परंतु पावसाळ्यात पुलावर पाणी राहात असल्याने वाहतूक खोळंबते. याठिकाणी उंच पूल होण्यासाठी परशुरामकर यांचा कायम पाठपुरावा सुरूच होता. शेवटी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्याने पुन्हा हा विषय खा. पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचेकडे लावून धरला होता.

.......

९ कोटी ७४ लाख रुपये होणार खर्च

२१ एप्रिलच्या शासन निर्णयान्वये दोन्ही पुलांच्या बांधकामाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खजरी-गिरोला साखळी क्र १/८५० करिता ५ कोटी ४० लक्ष ४५ हजार व खजरी - गिरोला साखळी क्र ३ / ७०० करिता ४ कोटी ३३ लक्ष ७२ हजार असे एकूण ९ कोटी ७४ लक्ष १७ हजार रुपये व पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय घोटी, घटेगाव, माहुली, वडेगाव, गोंगले व बकीटोला या पुलांच्याही बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यामुळे खजरी, बोथली, म्हसवाणी, खोडशिवणी, गिरोला, घटेगाव, मुंडिपार, घोटी, डव्वा, चिचटोला, गोंगले या परिसरातील नागरिकांनी खा. पटेल व आ. चंद्रिकापुरे यांचे आभार मानले.