लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (दि.१०) जिल्ह्यात पुन्हा ४३ कोरोना बाधितांची भर पडली. आठ कोरोना बाधित कोरोामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २७७ वर पोहचली आहे. तर एकूण कोरोना बाधितांचा आकडा ६४३ वर पोहचला असून यापैकी ३३२ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.सोमवारी आढळलेल्या एकूण ४३ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया शहरात ११ रुग्ण आढळले आहे. यात शास्त्री वॉर्ड, रेल्वे कॉलनी, सिव्हिल लाईन, वसंतनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि सात रुग्ण हे भीमनगर येथील आहेत. सडक अर्जुनी तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले असून पांढरवाणी, केसलवाडा व मंदिटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण आणि सौंदड येथे पाच रुग्ण, तिरोडा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून यामध्ये सरांडी, बिरसी येथे प्रत्येकी दोन व एक रुग्ण हा खोडगाव येथील आहे.आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपूर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण, सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले आहेत. यात गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी, मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे.तर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये गोंदिया तालुक्यातील असून मुंडीपार, सेजगाव व गोंदिया शहरातील रेलटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि गोंदियाच्या सिंधी कॉलनीतील एक रुग्ण आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण, देवरी तालुक्यातील भागी आणि परसटोला येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि एक रुग्ण हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत ११ हजार २४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ६४३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. १० हजार ४०० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.१४९ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. तर १६८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ४७८९ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले.यामध्ये ४६८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.१०७ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १९६ चमू आणि १०९ सुपरवायझर ९१ कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्त करण्यात आले आहे.
आणखी ४३ कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST
आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपूर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण, सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले आहेत. यात गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी, मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे.
आणखी ४३ कोरोना बाधितांची भर
ठळक मुद्दे८ कोरोना बाधितांची कोरोनावर मात : २७७ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण