शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोंदियात आणखी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:01 IST

गुरुवारी तब्बल नवे तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळा अहवालातून झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे२६७ अहवालाची प्रतीक्षाक्रियाशील रुग्ण संख्या ४२

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: सातत्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. गुरुवारी तब्बल नवे तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळा अहवालातून झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे. तर २६७ अहवालांची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ झाली असून एकूण बाधित रुग्ण २७९ आहेत. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण २२८ आहेत.गुरुवारी येथे तब्बल तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये देवरी येथे दोन आणि गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, चांदणीटोला,गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली असे एकूण चार रुग्ण असून मरारटोली येथे आढळून आलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक/अजुर्नी तालुक्यातील डवा येथील एक रुग्ण, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा व बेलाटी येथील एक रुग्ण, सालेकसा तालुक्यातील सीतेपार येथील कश्मीर येथून आलेला रुग्ण,आमगाव तालुक्यातील तिगाव व घाटटेमनी येथील प्रत्येकी एक यापैकी घाटटेमनीचा रुग्ण हा राजस्थान येथून आलेला आहे तर एक रुग्ण हा मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर येथून जिल्ह्यात आलेला आहे.गोंदियाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ९०६५ नमुने पाठविण्यात आले.त्यापैकी ८४१६ नमुने निगेटिव्ह तर २६७ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. २६७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. ११५ नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे.जिल्ह्यातील जे चार कोरोना बाधित जिल्ह्याबाहेर आढळले आहे त्यात नागपूर येथे तीन आणि एक रुग्ण बंगलोर येथे बाधित आढळला आहे.बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून चार, प्रयोगशाळेतून २६७ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून आठ असे एकूण २७९ बाधित रुग्ण जिल्ह्यात आहे.जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २०७ आणि गृह विलगिकरणात १०५६ असे एकूण १२६४ व्यक्ती विलगिकरणात आहे.बाधित असण्याची शक्यता असलेल्या रुग्णांचा शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील १६३२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये १६२४ अहवाल निगेटिव्ह तर आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने १७६ चमू आणि ६२ सुपरवायझरची ३९ कॅटेंटमेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे. कंटेंटमेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब,आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस