शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

नवोदयच्या विद्यार्थ्यांना लागणार वार्षिक १८ हजार शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:37 IST

ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोफत शिक्षणाचा बोजवारा : शेकडो विद्यार्थ्यांना भुर्दंड, पालकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक अठरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नवोदय विकास निधीच्या नावाखाली आकारलेल्या शुल्क रचनेमुळे पालक व विद्यार्थ्यात असंतोष आहे.केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या सकल्पनेतून देशातील ग्रामीण भागातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यासाठी १९८६ पासून जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. देशातील २८ घटक राज्य व ७ केंद्रशासीत प्रदेशात ही ७२९ विद्यालये कार्यान्वित आहेत.महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात नवोदय विद्यालये आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता दहावीला दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात ८० विद्यार्थ्याना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षण त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ८० टक्के जागा राखीव असल्याने अलीकडे बहुतांश विद्यार्थ्याचा नवोदयकडे कल वाढला आहे.परंतु मागील काही वर्षापासून सर्वासाठी मोफत असलेल्या नवोदय विद्यालयात विद्यार्थ्याची वर्गवारी पाडून फी घेण्याचे सत्र शासनाने सुरु केले आहे. आधी काही वर्ष इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रती विद्यार्थी प्रती महा २०० रुपये फी घेण्यात येत होती. ती ३१ आॅगस्ट २०१७ पासून दोनशे ऐवजी सहाशे रुपये करण्यात आली आहे. त्यातही नवोदय विद्यालय समितीने २० डिसेंबर २०१७ रोजी परिपत्रक क्र. एफ. क्र.१६-१४/२०१७/एनवीएस(एसए) १३६ नुसार नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षण घेत असलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना दरमहा १५०० प्रमाणे वार्षीक १८ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.शुल्कवाढीला विकास निधीचे नावसदर शुल्क नवोदय विकास निधीच्या गोंडस नावाखाली सर्व प्रवर्गाच्या कर्मचाºयांच्या पाल्यांना सक्तीने आकारण्यात आली.यामुळे मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याच्या नवोदय विद्यालयाच्या मूळ तत्वावरच घाला घातला गेला असून सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे तीव्र असंतोष आहे.ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण देणाऱ्या नवोदय विद्यालयात नवोदय विकास निधीच्या नावाखाली शुल्क आकारणे म्हणजे नवोदय संपविण्याचा शासनाचा डाव आहे. आधी दोनशे मग सहाशे व आता १५०० रुपये फी आकारुन शासनाद्वारे हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना फी आकारुन आर्थिक दहशत निर्माण करीत आहे.- नाना पटोले, माजी खासदारनवोदय विद्यालय समितीचे २० डिसेंबर २०१७ चे पत्रकानुसारच इयत्ता नववी ते बारावीच्या कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी फी आकारण्यात आली आहे. तशी सूचना नोटीस बोर्डावर व विद्यार्थ्याना देण्यात आली आहे.-एम.एस.बलवीर, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध

टॅग्स :Schoolशाळा