शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:14 IST

तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतालुका कॉँग्रेस कमिटी : मुख्यमंत्र्यांना पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.सध्या सुरु असलेल्या खरीप हंगामात तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे रोवणी होऊ शकली नाही व शेतातील ८० टक्के पºहे नष्ट झाले आहेत. हंगामाची वेळ निघून गेल्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळ पडलेला दिसत आहे. तरी शासनाने तत्काळ देवरी तालुक्यात दुष्काळ घोषित करुन दुष्काळाचा मोबदला शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये द्यावा, पीक विम्याची रक्कमही शासनाने स्वत: भरावी, रोजगार हमी योजनेचे काम त्वरित सुरु करावे तसेच शासकीय रुग्णालयात औषध, डॉक्टरांची सोय व पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.आपल्या मागणीसाठी तालुका कॉँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना, माजी आ. रामरतन राऊत, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, माजी उपसभापती संगीता भेलावे, शेडेपारच्या सरपंच माधुरी राऊत, गडेगावच्या सरपंच सविता वालदे, किसान आघाडी अध्यक्ष धनपत भोयर, युकाँचे माजी अध्यक्ष अविनाश टेंभरे, एन.एस.यु.आईचे तालुकाध्यक्ष अमित तरजुले, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता माणिक आचले, कमलेश पालीवाल, दलित आघाडी अध्यक्ष सुरेंद्र बंसोड, सुभाष कोचे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस