ग्रामस्वच्छता अभियान : विभागीय स्पर्धेसाठी गावात जय्यत तयारीसालेकसा : तालुक्यातील ग्राम गांधीटोला ग्रामपंचायतने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तर गाठले असून गाव विभागस्तरासाठी सज्ज आहे. ९ आॅक्टोबर रोजी अमरावतीची चमू गावाच्या परीक्षणासाठी येत आहे. त्यासाठी गांधीटोला ग्रामपंचायतने जय्यत तयारी केलेली असून सर्व गावकरी उत्साहाने कार्य करीत आहेत.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात परीक्षणासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करुन त्यांची पुर्तता करण्यासाठी गावकऱ्यांसोबत चर्चा करुन गावपातळीवर सर्वत्र स्वच्छता करणे, गावाचे सौंदर्यीकरण करणे, शौचालय स्वच्छतेसाठी प्रयत्न करणे, अंगणवाडी, शाळांकडे लक्ष देणे, रस्ते, नाली स्वच्छ करणे, रंगरंगोटी यावर चर्चा करुन सर्व गावकऱ्यांनी गावाला पुरस्कार मिळावा म्हणून खंडविकास अधिकारी व्ही.यु. पचारे, विस्तार अधिकारी यु.टी. राठोड यांच्या मार्गदर्शनात सरपंच रेखा फुंडे, उपसरपंच भुमेश्वर मेंढे, माजी सभापती तुकाराम बोहरे, बँक संचालिका उषा मेंढे, तंटामुक्त अध्यक्ष कि शोर लोधे, संत गाडगेबाबा स्वच्छता समिती अध्यक्ष विवेक उके, दलित वस्ती सुधार समिती अध्यक्ष मीना उके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गायत्री खरवडे, पोलीस पाटील रामेश्वर फुंडे, ग्रा.पं. सदस्य शालू कोरे, आशा मुनेश्वर, किशोर भांडारकर, मधूचर्जे, वंदना बोहरे यांनी मुल्याकंनासाठी गावाला तयार करण्याची जबाबदारी स्विकारली. गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते टी.जी. फुंडे, प्रल्हाद खरवडे, घनश्याम पाथोडे, मुख्याध्यापक सांगोळे, प्रेमलाल मुनेश्वर, लखन बागडे, डॉ. भुवन मेंढे, अनिल फुंडे, डॉ. सुषमा देशमुख, बबलू कोरे, अनिल मेंढे, पवन पाथोडे, धर्मराज राऊत, संजय उके, हरिभाऊ मेश्राम, प्रमिला लांजेवार, वंदना बोहरे, ग्राम सचिव संजय रहांगडाले ग्राम स्वच्छता अभियानासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. (तालुका प्र्रतिनिधी)
अमरावतीची चमू आज गांधीटोल्यात
By admin | Updated: October 8, 2014 23:28 IST