शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

टायर अभावी रूग्णवाहिका दोन महिन्यांपासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

मागील ६ महिन्यांपासून प्रशासन कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढा देत आहे. अशावेळी एखाद्या रूग्णालयातील रुग्णवाहिका नुसते टायर नसल्याच्या कारणातून २ महिन्यांपासून बंद असेल तर ‘धन्य ते प्रशासन आणि धन्य ते ग्रामीण रूग्णालयातील कारभारी’ एवढेच म्हणता येईल.असे असतानाच असाच प्रकार येथील ग्रामीण रूग्णालयात बघावयास मिळत आहे. एकेकाळी या रूग्णालयात डॉक्टरांची मोठी समस्या होती.

ठळक मुद्देग्रामीण रूग्णालयातील प्रकार : आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यात आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत असताना येथील ग्रामीण रूग्णालयातील रुग्णवाहिकेचे टायर बदलविण्यासाठी आरोग्य प्रशासनाला चक्क २ महीने लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापेक्षा मोठे आश्चर्य काय असेल? असे तालुक्यातील जनता बोलत असून आरोग्य विभागाच्या या अनागोंदी कारभारावर रोष व्यक्त करीत आहेत.मागील ६ महिन्यांपासून प्रशासन कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढा देत आहे. अशावेळी एखाद्या रूग्णालयातील रुग्णवाहिका नुसते टायर नसल्याच्या कारणातून २ महिन्यांपासून बंद असेल तर ‘धन्य ते प्रशासन आणि धन्य ते ग्रामीण रूग्णालयातील कारभारी’ एवढेच म्हणता येईल.असे असतानाच असाच प्रकार येथील ग्रामीण रूग्णालयात बघावयास मिळत आहे. एकेकाळी या रूग्णालयात डॉक्टरांची मोठी समस्या होती.या रूग्णालयात डॉक्टर टिकत नव्हते. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले. शेवटी डॉक्टर तर मिळाले पण सोईसुविधा पुरविल्या गेल्या नाही. त्यामुळे सतत ग्रामीण रूग्णालय चर्चेत राहीले. सध्या ग्रामीण रूग्णालयातील रुग्णवाहिका टायर खराब असल्याच्या कारणातून मागील २ महिन्यांपासून उभी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुका दहशतीत आहे. अनेक रूग्ण या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी येतात. अशात रूग्णालयाने रूग्णांना गोंदियाला रेफर केले तर जायचे कसे हा प्रश्न रूग्ण आणि त्यांचा नातेवाईकांना सतावतो. कधीकधी इमरजंसीच्या नावावर खासगी वाहन करावे लागत असून यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी गरीबांच्या आवाक्याबाहेरची असते. अशी गंभीर स्थिती असतानाही आरोग्य विभाग व ग्रामीण रूग्णालयाला याचे काहीच सोयरसुतक दिसून येत नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदिप जैन यांनी रूग्णालय प्रशासनाला ३-४ वेळा रुग्णवाहिका दुरूस्ती विषयी माहिती दिली.पण ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने कायमचा कानाडोळा करीत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. परिणामी जैन यांनी शुक्रवारी (दि.२५) थेट खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या दूरध्वनीवरून माहिती दिली. यावर २ दिवसांत नवीन रुग्णवाहिका देण्यात येईल असे प्रदीप जैन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्य