शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

आंबेनाला प्रकल्पाला आले अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:49 IST

अनेक वर्षापासून रखडलेल्या आंबेनाला तलावाच्या मंजुरीकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी दाखल झाले. आमदार विजय रहांगडाले तसेच वनविभागाच्या नागपूर व भोपाळ येथील अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन ते तसा अहवाल २५ दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीकरिता ठेवणार आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केली पाहणी : २५ दिवसात मिळणार हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अनेक वर्षापासून रखडलेल्या आंबेनाला तलावाच्या मंजुरीकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी दाखल झाले. आमदार विजय रहांगडाले तसेच वनविभागाच्या नागपूर व भोपाळ येथील अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन ते तसा अहवाल २५ दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीकरिता ठेवणार आहेत. त्यामुळे निमगाव येथील आंबेनाला प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.आंबेनाला प्रकल्प १९७२ पासून ते २००६ पर्यंत रखडलेला होता. याकरिता अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. भंडारा, नागपूर व भोपाळपर्यंत पत्र व्यवहार ही झाला होता. दरम्यान, सन २०१५ मध्ये आमदार विजय रहांगडाले यांना टप्याटप्याने मंजुरीसाठी कागदपत्र जुळवाजुळव करण्याबाबत शासनाने पाठपुरावा केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाद्वारे वनविभागाला प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचा ३१ कोटींचा एफआरए निधी राज्यमंत्री मंडळाद्वारे केंद्र शासनास भरणा करण्यात आला. वनविभागाची जमीन व झाडांची किंमत यांचा समावेश करण्यात आल्यानंतरच राज्य शासनाने केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला.हा प्रकल्प नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० किलोमिटर अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीकरिता चित्रफितीसह संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी प्रत्यक्ष राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव कामडी यांनी आंबेनालाची पाहणी केली. प्रकल्पाचे कार्य ६० टक्के पूर्ण झाले असून तलावाच्या सुरक्षा भिंतीला पिचिंग, वेस्ट वेअर, कालवा निर्मिती व अन्य कार्य पूर्ण झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आ. रहांगडाले यांनी येणाऱ्या दोन दिवसांत प्रकल्पाच्या मंजुरीकरिता केंद्रीय मंत्री हर्षवर्धन व नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी उपअभियंता कापसे, भाजपचे माजी उपाध्यक्ष मदन पटले, सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, संजय बैस, उमेश पटले, नीरज सोनेवाने, विवेक ढोरे व किशोर ठाकूर उपस्थित होते.५०० हेक्टर जमिनीचे होणार सिंचनया प्रकल्पामुळे ५०० हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. लाभक्षेत्रातील गावांची संख्या १८ राहील. एवढेच नव्हे तर हा प्रकल्प बफर झोनमध्ये असल्यामुळे शेतीच्या सिंचनाव्यतिरिक्त नागझिरा वन्यजीव अभयारण्यांतर्गत असलेल्या प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. तसेच निमगाव तलावाचे नैसर्गिक स्वरुप बघता विदेशी पक्ष्यांकरिता नवेगावबांध तलावाचे स्वरुप प्राप्त होणार आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प