लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते हेच त्याच पक्षाची सर्वात मोठी ताकद असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहचवावे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चिपणे वाढणार असून हा पक्ष क्रमांक एकचा पक्ष राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड यांनी येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रेलटोली येथील राष्ट्रवादी भवन येथे करण्यात आले होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.राजेंद्र जैन, विजय शिवणकर, पंचम बिसेन, पंडित कांबळे, विनोद हरिणखेडे, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, अशोक सहारे, मनोहर चंद्रीकापुरे, रमेश ताराम, किशोर तरोणे, मनोज डोंगरे, मनोहर वालदे, केतन तुरकर, प्रभाकर दोनोडे, गणेश बरडे, बाळकृष्ण पटले, लक्ष्मण चंद्रीकापुरे, सुरेश हर्षे, रमेश चुºहे, मनोज डोंगरे, जितेश टेंभरे, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, वंदना बोरकर, ललिता चौरागडे, संध्या गजभिये, योगेश बन्सोड, लोकपाल गहाणे, प्रदीप मेश्राम, रजनी गौतम उपस्थित होते.गायकवाड म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांची स्थिती फार वाईट झाली आहे. तसेच हा समाज पुन्हा २० वर्षे मागे गेला आहे. भाजप सरकारने देशात नोटबंदी करुन देशाला मंदीच्या खाईत लोटले.पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तर वाढत्या महागाईने सर्वच जनता त्रस्त झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सत्ता बदल आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.आ.जैन यांनी खा.प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाचा विस्तार करुन सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे आवाहन केले आहे. तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्याचे आवाहन केले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी किरण वैद्य, आरजू मेश्राम, तेजराम मडामे, किरण बन्सोड, आदेश फुले, प्रवीण शेंडे, प्रशांत बडोले, आर.के.जांभुळकर, रविंद्र मेश्राम, अशोक डोंगरे, जीवन लंजे, चंदन गजभिये, रौनक ठाकूर, प्रमोद डोंगरे, यशवंत सहारे, सुरेश उके, अजय डोंगरे यांनी सहकार्य केले.इंदू मिल स्मारकच्या कामाला अद्यापही सुरूवात नाहीइंदू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्याचे कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. याला आता चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही स्मारकाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. हे सरकार केवळ समाजबांधवाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.दोन हजार कोटीचा घोटाळा दडपलाराज्याच्या सामाजिक न्याय विभागात दोन हजार कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याऐवजी या विभागाच्या मंत्र्यांने व सरकारने हा घोटाळा दडपल्याचा आरोप जयदेव गायकवाड यांनी केला. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा कोट्यवधी रुपयांचा निधी इतर वळविण्याचे काम राज्यातील विद्यमान सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:20 IST
कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते हेच त्याच पक्षाची सर्वात मोठी ताकद असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहचवावे.
सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्य करावे
ठळक मुद्देजयदेव गायकवाड : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग कार्यकर्ता मेळावा