शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

गोर्रे धान खरेदी केंद्राचे सर्व आरोपी संचालक अद्याप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 20:39 IST

सोसायटीने एकूण धान खरेदी ४५५९५.८०  क्विंटल एवढी दाखविली. त्यांपैकी सोसायटीने ३६८३२.३३ क्विंटल धानाचा पुरवठा महामंडळाकडे केला; तर ८६३.४७ क्विंटल धान महामंडळाला दिले नाही. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी संस्थेच्या गोदामात तपासणीसाठी आले असता, त्यांना फक्त १५० क्विंटल धान आढळून आले. अर्थात एकूण ८६१३.४७ क्विंटल धान  सोसायटीने गबन केले असून महामंडळाला दिलेच नाही. त्याची किंमत अंदाजे १ कोटी ६७ लाख १० हजार १३१ .८० रुपये एवढी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : १ कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८ रुपयांच्या धान घोटाळा करणाऱ्या ग्राम गोर्रे येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह इतर सर्व संचालक तसेच उपप्रादेशिक व्यवस्थापक आणि विपणन निरीक्षक यांसह एकूण १४ जणांविरोधात आदिवासी विकास महामंडळाने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस त्यांच्या शोधात असताना सर्व संचालक अद्याप फरार असून बाहेर फिरत न्यायालयातून जामिनासाठी धावपळ करीत असल्याचे बोलले जात आहे.   आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने ग्राम गोर्रे येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था (१०४५) मार्फत पणन हंगाम २०२१-२२ अंतर्गत खरीप हंगामात १४५८०.४० क्विंटल धान खरेदी केली. तसेच रब्बी हंगामात ३१०१५.४० क्विंटल धान धान खरेदी दाखविण्यात आली. सोसायटीने एकूण धान खरेदी ४५५९५.८०  क्विंटल एवढी दाखविली. त्यांपैकी सोसायटीने ३६८३२.३३ क्विंटल धानाचा पुरवठा महामंडळाकडे केला; तर ८६३.४७ क्विंटल धान महामंडळाला दिले नाही. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी संस्थेच्या गोदामात तपासणीसाठी आले असता, त्यांना फक्त १५० क्विंटल धान आढळून आले. अर्थात एकूण ८६१३.४७ क्विंटल धान  सोसायटीने गबन केले असून महामंडळाला दिलेच नाही. त्याची किंमत अंदाजे १ कोटी ६७ लाख १० हजार १३१ .८० रुपये एवढी होते. तसेच या सोसायटीने नवा आणि जुना बारदाना एकूण २५ हजार ६३४ क्विंटल हासुद्धा महामंडळाकडे दिला नसून त्याची किंमत १० लाख २७ हजार ८०७  रुपये एवढी आहे. धान खरेदी केंद्राचे संचालक, विपणन निरीक्षक आणि उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी संगनमत करून धान आणि बारदाना मिळून एकूण १ कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८.८० रुपयांच्या धान आणि बारदान्याचा घोटाळा केल्याचा प्रकार आदिवासी महामंडळासमोर उघडकीस आला. त्यामुळे आदिवासी महामंडळाचे लेखा व्यवस्थापक सागर भागवत यांनी शुक्रवारी (दि. १४) सालेकसा पोलीस ठाण्यात गोर्रे येथील धान खरेदी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, विपणन निरीक्षक व उपप्रादेशिक व्यवस्थापकांविरुद्ध कायदेशीर लेखी तक्रार केली व सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत संचालकांना माहिती होताच त्यांनी पोलिसांच्या हाती येण्यापूर्वीच गावातून पळ काढला आहे. बाहेरूनच ते आता न्यायालयातून जामीन  मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. ३ दिवसांपासून फरार आरोपींना सालेकसा पोलीस शोधत असून प्रकरणाचा तपास पीएसआय अमोल मुंडे करीत आहेत.

 या लोकांविरुद्ध पोलिसांत तक्रार- या प्रकरणात संतोष सदनलाल मडावी (मरकाखांदा), शिवाजी एन. कोसमे (सीतेपाला), अरुण मनमोनी फुंडे (सिंधीटोला), जयलाल हरू पटले (गोर्रे), हिरामण जिंदाफोर (सीतेपाला),  झाडू अडकू गावड (जोशीटोला),  खोदूलाल टेकाम (शिकारीटोला), राम लालसू सिरसाम (मानागड), अनिल मनमोहन फुंडे (सिंधीटोला), प्रभारी विपणन निरीक्षक मुंजा एन. इंगळे (नाशिक), प्रभारी विपणन निरीक्षक चेतन जुगनाखे (देवरी), रोजंदारी प्रतवारी कार गजानन मरसकोल्हे (देवरी), उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष श्रीनाथ मुळेवार (देवरी) यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड