शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

धोक्याची घंटा ! पाच वर्षात घटली सारसांची संख्या, गोंदिया जिल्ह्यात उरले केवळ २८ सारस

By अंकुश गुंडावार | Updated: July 1, 2024 19:36 IST

Gondia Wildlife News: महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आहेत. मात्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारसांच्या संवर्धन करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सारससुद्धा आता माळढोक पक्ष्याप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

गोंदिया - महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आहेत. मात्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारसांच्या संवर्धन करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सारससुद्धा आता माळढोक पक्ष्याप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या सारस गणनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ सारस पक्षी कमी झाले आहे, तर गेल्या पाच वर्षांत सारस पक्ष्यांची संख्या ४५ वरून २८ वर आली आहे. त्यामुळे सारसांचा माळढोक होऊ द्यायचा नसेल तर सारस संवर्धनासाठी आत्ताच पाऊल उचलण्याची गरज आहे.

पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी सातत्याने कार्यरत सेवा संस्था आणि वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने २३ ते ३० जूनदरम्यान गोंदिया, बालाघाट, भंडारा तीन जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूण ७०-८० ठिकाणी सेवा संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र स्वयंसेवी आणि वनविभाग गोंदियाच्या कर्मचाऱ्यांनी सारस गणना यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यासाठी ३९ चमू तयार करून सारस पक्ष्यांच्या विश्रांतीच्या जागेवर पहाटे ४.४५ वाजे ते सकाळी ९ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर थेट जाऊन गणना करण्यात आली. या सारस गणनेत जिल्ह्यात २८ सारस पक्ष्यांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत सारस पक्ष्यांची संख्या घटली असून, ही सारसप्रेमींसाठी निराशाजनक बाब आहे, तर गोंदिया जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेल्या सारस पक्ष्यांचीसुद्धा माळढोक होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याने निश्चितच ही धोक्याची घंटा आहे. विशेष सारस संवर्धनाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र यानंतरही यात फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे.सारस गणनेत यांचा सहभागसारस गणनेत उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, सहायक वनसंरक्षक योगेंद्रसिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, रघुवेंद्र मून, सचिन धात्रक, सोनटक्के, गोवर्धन राठोड, सेवा संस्थेची चमू, शेतकरी आणि वनविभागाचे कर्मचारी यांचा सहभाग होता.

जिल्हानिहाय सारस पक्ष्यांची संख्यागोंदिया जिल्हा- २८बालाघाट जिल्हा- ४५भंडारा जिल्हा ०४गोंदिया जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांतील सारस पक्ष्यांची संख्यावर्ष सारस२०२०-४५२०२१-३९२०२२-३४२०२३-३१२०२४-२८सारसांची घटती संख्या ही चिंतेची बाबसन २०२४च्या सारस गणनेनुसार, विशेषत: गोंदिया जिल्ह्यात तसेच भंडारा जिल्ह्यातही सारस गणना करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात सारस पक्षी गोंदिया आणि जिल्ह्यालगतच्या सीमा भागात आढळतो. तत्कालीन सारस गणनेनुसार महाराष्ट्र राज्यात ३२ सारस पक्षी आढळले. ही चिंतेची बाब आहे. सारस संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थासह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

उपाययोजनांवर प्रश्नचिन्हसारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. पण तिन्ही जिल्ह्यात उपाययोजना केवळ कागदावर राबविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवVidarbhaविदर्भ