शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बºयाच शेतकºयांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवले आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकºयांचे ८० धानाचे पुंजणे जाळले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण : लाखो रुपयांचे नुकसान, पोलिसांसमोर आव्हान, नुकसानीचे पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : देवरी तालुक्यातील चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकºयांचे धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. ही घटना ताजी असताना पुन्हा शुक्रवारी (दि.२९) चिचगडपासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या १३ शेतकºयांचे धानाचे पुंजणे जाळल्याची घटना उघकीस आली. दरम्यान याप्रकारामुळे शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या शेतातील धानाचे पुंजणे सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांच्यावर शेतात पहारा देण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बºयाच शेतकºयांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवले आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकºयांचे ८० धानाचे पुंजणे जाळले. यात शेतकऱ्यांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचे पंचनामे सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे चिचगडपासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या कडीकसा येथील १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याची माहिती गावकरी आणि शेतकऱ्यांना होताच त्यांनी शेतातकडे धाव घेत पुंजण्यांना लागली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग रात्रीच्या सुमारास लावली असल्याने संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर रक्ताचे पाणी करुन आणि राबराब राबून पीक घेतले. धानाची मळणी करुन बँका आणि देणीदारांची देणी फेडू अशा विचारात शेतकरी होते. मात्र धानाचे पुंजणे जळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा ही घटना घडल्याने ज्या शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतात आहेत ते दहशतीत असून त्यांना आता रात्री शेतात पहारा देण्याची वेळ आली. दरम्यान या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी देवरीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. चिचगड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.पुंजण्यांना आग लावणारा कोण?चिचगडसह सहा गावातील ८० अधिक धानाच्या पुंजण्यांना अज्ञात इसमाने आग लावली. यात शेतकऱ्यांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी कडीकसा येथील १३ शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून धानाचे पुंजणे जाळण्यामागील नेमके कारण काय आणि पुंजणे जाळणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने पोलिसांसमोर सुध्दा आव्हान उभे ठाकले आहे.शेतकऱ्यांचा शेतात पहाराचिचगड परिसरात धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धानाचे पुंजणे तयार करुन ठेवण्यात आले असून या घटनेमुळे ते सुध्दा सुरक्षीत राहण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता शेतात रात्रीच्या वेळी पहारा देण्यास सुरूवात केली आहे.दुहेरी संकटाचा सामनापरतीच्या पावसामुळे आधीच धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून काही प्रमाणात धान शिल्लक होते. मात्र त्या धानाच्या पुंजण्यांना जाळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून त्यांच्यावर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.१३ शेतकऱ्यांचे नुकसानकडीकसा येथील दारूसिंग हलामी, रासो ताराम, छन्नो कुंभरे, सुमो धावडे,भानुराम गुरुपंच, मुऱ्हा कुंभरे, दशरथ धावडे,चमली ताराम, चैतराम हलामी, प्रकाश ब्बोगा, माहू हलामी, नारायण टेंभुर्णे, छगन अहामी या १३ शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे शुक्रवारी जाळण्यात आले. यामुळे २९ हेक्टरीमधील धानाची संपूर्ण राख झाली असून २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :agricultureशेतीfireआग