शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

दीड वर्षानंतर आजपासून वाजणार शाळांची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर आठवी ते १२वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग आठवी ते १२ वीचे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आज, सोमवारपासून (दि. ४) शहरी आणि ग्रामीण भागांतील जिल्ह्यातील ११५९ शाळा सुरू होत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या शाळा सुरू होत असल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक कामाला लागल्याचे चित्र होते. ७ ऑक्टोबरपासून मंदिराचे द्वार उघडणार असल्याने शाळा आणि मंदिराची घंटा वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने वर्ग पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णय घेतल्याने गोंदिया जिल्ह्यातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. या शाळांत जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ५१९ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर आठवी ते १२वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग आठवी ते १२ वीचे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. 

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे करावे लागणार पालन - आज, सोमवारपासून शाळा सुरू असून यासाठी शासनाने शाळांना काही नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यात शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित तापमान मोजणे व प्रवेशद्वारावरच त्यांचे सॅनिटायझिंग करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. शाळा सुरुवात होताच दोन आठवडे अभ्यासाला सुरुवात न करता खेळमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे निर्देश दिले आहे. 

दिवाळीनंतर वर्ग पहिली ते चौथीच्या उघडणार शाळा- शिक्षण अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ३० सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत वर्ग पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

विद्यार्थी व पालकांनाही उत्सुकता - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नाहीत; त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागत होते. या प्रकाराने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही कंटाळले होते. मात्र आता आज, सोमवारपासून प्रत्यक्षात शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पालकांना उत्सुकता असली तरी तेवढीच काळजीदेखील कायम आहे. 

मंदिराबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना नाही 

- राज्य सरकारने ७ ऑक़्टोबरपासून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहे. मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश देताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सविस्तर मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळा