शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीपाठोपाठ पतीचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:41 IST

जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.

ठळक मुद्देमुलगा झाला अनाथ : एका दिवसाच्या फरकाने सारख्या वेळेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्म-मृत्यू हा नैसर्गिक असून कोणाच्याही हाती नाही. सांसारिक जीवनाचा गाडा चालविताना पती-पत्नीची साथ महत्वपूर्ण असते. मात्र कमावता पती आजारी पडल्याने पत्नीने कुटुंबाचा भार उलचला असताना ध्यानीमनी नसताना पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने आजारी पतीनेसुद्धा, पत्नीचे अंत्यसंस्कार करून नातलग घरी येताच जीव सोडला.एकमेकांच्या सुख:दु:खात सहभागी होवून, काबाड-कष्ट करुन मुलाबाळांच्या सुखमय जीवनासाठी जन्मदात्यांची अविरत धडपड असते. घरचा कमवता गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे खाटेवर पडला होता. कमावती पत्नी व एका अविवाहित मुलाने घर सांभाळला. अशातच एकाएकी पत्नी अंतकला गुरुवारी दुपारी ३.२० वाजता मृत्युमुखी पडली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.६) दुपारी नातलगांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व मंडळी घरी आली. दरम्यान इकडे अंथरुणावर पडलेला पती मयाराम यांची ४.२० वाजताच प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. सर्व आप्तस्वकीय आलेलेच असल्याने मयारामच्या पार्थिवावर पत्नीच्या समाधीजवळच अंत्यसंस्कार उरकवण्याची दुर्दैवी पाळी येथील बारगसाडे कुटुंबावर आली. या पती-पत्नीच्या सलग मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.बोंडगावदेवी येथे मयाराम मंगरु बारसागडे (६२), पत्नी अंतकला बारसागडे (५५) व एक अविवाहित मुलगा गजानन (२५) हे तिघेही राहत होते. दोघाही पती-पत्नीने स्वत:च्या अंगमेहनतीने काबाडकष्ट करुन दोन मुलींचा विवाह केला.पती-पत्नीच्या परस्परांवर असलेल्या प्रेमाने ते दोघेही गोडीगुलाबीने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. अशा या सुखी संसारावर काळाने घाला घातला. एकाच दिवशी पती-पत्नीवर अंतिम संस्कार होणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. आयुष्यात दोघांनीही कष्ट केले. दोघेही एकमेकांच्या सोबतीला राहत होते. अशी ही प्रेमळ जोडी एकाच दिवशी निघून गेली.मयाराम यांची मागील काही महिन्यांपासून प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते. पत्नी अंतकला ही मात्र शरीर स्वास्थ्याने बरी होती. खाटेवर पडलेल्या पतीची सेवा करण्यातच तिने धन्यता मानली होती. खाटेवर पडलेल्या मयारामला पत्नी अंतकला मोठी आधार होती. ही जोडी तुटेल अशी पुसटशी कल्पनाही घरच्यांसह शेजाºयांनासुद्धा नव्हती. परंतु म्हणतात ना जन्म-मृत्यू आपल्या हातचा नाही आणि तेच घडले. ध्यानीमनी नसताना एकाएकी गुरुवारी दुपारी पत्नीने पतीचा साथ सोडून मृत्यूला कवटाळले.पत्नीच्या मृत्यूची हालचाल पतीला लागली. तो पत्नी दु:खवियोगात पडला. पत्नीवर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. स्मशान भूमितून सर्व लोक घरी आले व मयारामने त्याच दिवशी नेमकी तिच वेळ ४.२० साधून मृत्यूला कवटाळले. दोघाही पती-पत्नीचे अंतिम संस्कार शेजारीच करण्यात आले. पती-पत्नीच्या एक दिवसाच्या फरकाने नेमक्या सारख्या वेळेस मृत्यू झाल्याची घटना गावात प्रथमच घडल्याचे सांगीतले जाते. मात्र सज्ञान असलेला मुलगा गजानन अनाथ झाला.

टॅग्स :Deathमृत्यू