शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

आठ दिवस रेकी करून गुरूबिरने पळविले २२० ग्रॅम सोने

By नरेश रहिले | Updated: September 9, 2023 21:09 IST

जवळून ११ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

गोंदिया: शहरातील हॉटेल सेंटर पाईंट येथे आठवडाभर थांबून गोंदिया शहराची रेकी करणाऱ्याने आलमारीचे लॉक दुरूस्त करण्याच्या नावावर एका घरात प्रवेश केला. त्या घरातील तब्बल २२० ग्रॅम सोने पळविले होते. त्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या आरोपीला ९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून ११ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

गोंदिया गोंदिया पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ममता खटवाणी रा. बाजपेयी वॉर्ड, सिव्हील लाईन, गोंदिया यांच्या घरी आलमारीचे लॉक दुरूस्त करण्याच्या नावावर २१ ऑगस्ट २०२३ त्यांच्या घरामध्ये गेला. त्याच्या जवळून २२० ग्रँम सोन्याचे दागिणे चोरुन नेले. या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये आलमारीचे लाँक दुरुस्ती करणारे, चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, जबरी चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.

त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती घेत गुजरातच्या सुरज जिल्ह्यातील उधना बापुनगर गुरुबिर धिरसिंग सिंग चव्हाण (३१) याला मध्यप्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील कातिया येथे अटक केले. त्याने गोंदियातून ही चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन, चित्तंरजन कोडापे, चेतन पटले, पोलीस शिपाई संतोष केदार, हंसराज भांडारकर, चालक पोलीस हवालदार लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, सायबर सेलचे पोलीस हवालदार दिक्षीत दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी केली आहे.गोंदियाच्या हॉटेल सेंटर पाईंट येथे खोली घेऊन वाहस्तव्यास होता आरोपी गुरुबिर धिरसिंग सिंग चव्हाण (३१) हा गोंदियाच्या हॉटेल सेंट्रल पॉईट श्री टॉकीज रोड गोंदिया येथे थांबलेला होतो. १४ ते २१ ऑगस्ट दरम्यान त्याने गोंदियात मुक्काम ठोकून रेकी केली. संधी साधत त्याने चोरी केली होती.१७३.५ ग्रॅम सोने जप्त

आरोपीजवळून एक मोबाईल हँडसेट व १७३.५ ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत ११ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.१५० सीसीटिव्ही फुटेज तपासणी

या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. आरोपी हा रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल सेंटर पॉईट येथे १४ ते २१ ऑगस्टपर्यंत राहिला. गुन्हा करून तुमसर रेल्वे स्टेशन येथे गेल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. तुमसर रेल्वे स्टेशन येथुन तो सुरत येथे गेल्याचे निष्पन्न झाले.आरोपीने बदलले १४ सीमकार्ड

आरोपीने आपल्यापर्यंत पोलीस पोहचू नयेत म्हणून वारंवार आपला मार्ग बदलून पोलिसांची दिशाभूल केली. त्याने आतापर्यंत १४ सीम कार्ड व मोबाईल बदलल्याचे तांत्रीक विश्लेषणाद्वारे पुढे आले आहे.दोन वर्षाचा तुरूंगवास भोगलेला गुन्हेगार

आरोपी गुरुबिर धिरसिंग सिंग चव्हाण (३१) याने राजस्थान, दिल्ली, दुर्ग छत्तीसगड येथे अशाच प्रकारचे गुन्हे केलञयाची माहिती पोलिसांना दिली. दिल्ली येथील गुन्हयामध्ये २ वर्ष तुरूंगवास भाेगून तो बाहेर आला होता. त्याला सन २०२१ मध्ये नंदनवन पोलीस नागपुर यांनी देखील अटक केली होती.कलुू, चाबी बनविण्याच्या नावावर करतो चोरी

आरोपी हा आपल्या घरापासून दूर बाहेरील राज्यामध्ये जातो. जेथे गुन्हा करायचा आहे तेथे वास्तव्य करून एक जुनी सायकल विकत घेतो. कुलुप व चाबी बनवतो असे आरेडत गल्लोगल्लीत फिरून रेखी करून कुलुप व चाबी बनविण्यासाठी घरात प्रवेश करतो. घरातील कुटुंबातील सदस्यांचे लक्ष विचलित करून कपाटातील सोने किंवा मौल्यवान वस्तु चोरून पलायन करतो.