अखेर गोदामातील धानाचे वजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:01 PM2019-05-09T21:01:49+5:302019-05-09T21:03:10+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनने चौकशीला सुरूवात केली.

After all, we will weigh the weight of the godown | अखेर गोदामातील धानाचे वजन करणार

अखेर गोदामातील धानाचे वजन करणार

Next
ठळक मुद्देसालेकसा तालुक्यातील प्रकरण : मार्केटिंग फेडरेशनकडे नजर, चौकशी सुरू, जिल्हाधिकाऱ्यांना देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सालेकसा तालुक्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनने चौकशीला सुरूवात केली. गोदामात नेमके किती धान कमी आहे याचे वजन करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी चौकशी समितीने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली होती.त्यांनी बुधवारी (दि.८) याला मंजुरी दिली असून आता मार्केटिंग फेडरेशनच्या मंजुरीनंतर धानाचे वजन केले जाणार आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. यासाठी दोन्ही विभागाने यंदा जिल्ह्यात १०० धान खरेदी केंद्र सुरू केले होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सहकारी संस्थाशी करार करुन त्यांच्या माध्यमातून धान खरेदी करते.
यातंर्गत सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेने यंदा १ लाख ४० हजार क्विंटल धान खरेदी केली होती. यापैकी ७९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली. त्यामुळे सहकारी संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक होते. मात्र संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
तक्रारीची दखल घेत याची खातजमा करण्यासाठी चौकशी समिती गठीत करुन चौकशी करण्याचे आदेश दिले. मुंबई येथील मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक कोक आणि भंडाराचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी खर्चे यांनी गोंदिया येथे पोहचून संपूर्ण खरेदी प्रक्रियेची चौकशी केली.तसेच सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. मात्र गोदामात नेमके धान कमी किंवा बरोबर आहे हे धानाचे वजन केल्याशिवाय कळू शकत नाही. त्यामुळे गोदामातील संपूर्ण धानाची उचल करुन त्याचे वजन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी चौकशी समितीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना पत्र लिहून केली.
जिल्हाधिकाºयांनी बुधवारी (दि.८) याला मंजुरी दिली.आता मार्केटिंग फेडरेशनची मंजुरी मिळताच धानाची उचल करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे चौकशी समितीच्या सदस्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
चौकशी किती दिवस चालेल ?
सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामातील धानाचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. प्रत्यक्षात ५० हजार क्विंटल धान कमी असल्यास हा घोळ कोट्यवधी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तर्कविर्तक लावणे चुकीचे आहे. तर धानाची उचल करुनच धान कमी आहे की बरोबर आहे हे कळणार आहे. त्यामुळे नेमकी ही चौकशी किती दिवस चालेल हे सांगता येणार नसल्याचे चौकशी समितीने सांगितले.
इतर गोदामातील धानाचे काय?
केवळ सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात कमी धान असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने चौकशीला सुरूवात केली आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोदाम असून या गोदामातील धान खरेदी ऐवढेच आहे किंवा नाही याची खातरजमा कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्र आणि गोदामांना सीसीटीव्ही कॅमेरे का नाही
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची अफरातफर व चोरी होवू नये तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकडे का दुर्लक्ष केले जात असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नियंत्रण नेमके कुणाचे ?
जिल्ह्यातील सहकारी संस्था जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसह करार करुन धान खरेदी करते. खरेदी केलेला धान भरडाईसाठी उचल होईपर्यंत गोदामात ठेवते. मग यासर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे काम नेमके जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे की कुणाचे आहे हा प्रश्न देखील अनुउत्तरीत आहे.
 

Web Title: After all, we will weigh the weight of the godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार