शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:58 IST

२०१२ नंतर स्थानिक प्रभाग सदस्यांची निवडच नाही : प्रथमच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडण्याची संधी

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : स्थानिक नगरपंचायतीची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असून, या निवडणुकीत या नगरपंचायत क्षेत्रातील आमगाव खुर्द या भागातील नागरिकांना आपला प्रभाग सदस्य निवडून देण्यासाठी तब्बल १३ वर्षानंतर मतदान करण्याची संधी मिळणार आहे. निवडणुकीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापू लागले आहे, तर दुसरीकडे आमगाव खुर्द येथील नागरिकांमध्ये आपला स्थानिक नगरसेवक निवडून देण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.

आमगाव खुर्द ग्रामपंचायतीची शेवटची निवडणूक २०१२ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर येथील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. परंतु याच दरम्यान २०१५ मध्ये सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला. परंतु आमगाव खुर्द ग्रामपंचायत ही तालुक्याच्या ठिकाणी असल्याने आमगाव खुर्दला नगर पंचायतमध्ये समावेश करण्यात यावे, अशी मागणी आमगाव खुर्द येथील नागरिकांनी केली. परंतु २०१७ पर्यंत आमगाव खुर्दचा समावेश नगरपंचायतीत झाला नाही. अखेर निवडणूक आयोगाने २०१७ मध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याची अधिसूचना जारी केले. परंतु आमगाव खुर्द येथील नागरिकांनी नगरपंचायतमध्ये समावेश करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे मतदारांना मतदानाची संधी मिळाली नाही.

जि.प. व पं.स. क्षेत्र बदलले२०२१ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र आता आमगाव खुर्द ग्रा.पं. सालेकसा नगरपंचायतचा भाग झाल्याने आमगाव खुर्दला जि.प. गट आणि पंचायत समिती गणातून वगळण्यात आले, तर तिरखेडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्र तयार करण्यात आले. अशात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतसुद्धा मतदान करण्याची संधी आमगाव खुर्द येथील मतदारांना मिळाली नाही. २०२२ मध्ये सालेकसा नगरपंचायतचा कार्यकाळ संपला. परंतु कार्यकाळ संपल्यानंतर अडीच वर्षे लोटली तरी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. आता येत्या ऑक्टोबरपर्यंत नगरपंचायत निवडणूक होणार असून, तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध होईल.

संघर्षानंतर २०१८ मध्ये नगरपंचायतमध्ये समावेशआता आमगाव खुर्द येथे ना ग्रामपंचायत ना नगरपंचायत असे चित्र निर्माण झाले होते. आमगाव खुर्दला नगरपंचायतमध्ये समावेश न करता निवडणूक आयोगाने सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक घेतली. सत्ता स्थापन झाली, तर इकडे आमगाव खुर्दवासी पोरके झाले होते. अशात येथील नागरिकांनी नगर पंचायतमध्ये सामावून घेण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले. तसेच ग्रामपंचायत सदस्य ब्रजभूषण बैस यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर २०१८ मध्ये आमगाव खुर्दचा नगरपंचायतमध्ये समावेश करण्यात आला. अशात निवडणुका होतील असे वाटले; परंतु सालेकसा नगरपंचायतीचा फक्त एकच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली नाही. अशात पुन्हा आमगाव खुर्द येथील मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली नाही.

"मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आमगाव खुर्दला सालेकसा नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले. पण गेल्या आठ वर्षांपासून निवडणूक झाली नाही. पण आता लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची संधी मिळेल."- ब्रजभूषण बैस, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सालेकसा

"आम्ही येथील स्थानिक नागरिक असून, मागील १३ वर्षांपूर्वी मतदान केले होते. तेव्हापासून आम्हाला मतदान करण्याची संधी मिळाली नाही. आता निवडणूक होऊ घातली असून, मतदान करण्याची संधी मिळणार आहे."- सुनील असाटी, स्थानिक नागरिक, आमगाव खुर्द.

टॅग्स :gondiya-acगोंदियाVotingमतदानElectionनिवडणूक 2024amgaon-acआमगाव