शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:37 IST

दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळातील कोतरलिया व जामगाव स्थानकांच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसºया रेल्वे लाईन परियोजनेशी जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.

ठळक मुद्देकाही गाड्या रद्द तर काहींचा विस्तार : तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेला यार्डशी जोडण्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळातील कोतरलिया व जामगाव स्थानकांच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेशी जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.सदर १० दिवसांपर्यंत (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर, झारसुगडा-बिलासपूर-झारसुगडा दरम्यान रद्द राहील. सदर कालावधीत या गाडीचे परिचारलन बिलासपूर-गोंदिया-बिलासपूर दरम्यान निर्धारित वेळेवर राहील. तर (५८१११/५८११२) टाटानगर-इतवारी-टाटानगर पॅसेंजर, झारसुगडा-इतवारी-झारसुगडा दरम्यान रद्द राहील. सदर कालावधीत या गाडीचे परिचालन टाटानगर-झारसुगडा-टाटानगर दरम्यान निर्धारित वेळेवर राहील. रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांच्या सुविधेसाठी १८ ते २७ जुलैपर्यंत एकूण १० दिवस गाडी (१२८३४) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा व रायगड दरम्यान पॅसेंजर बनवून चालविण्यात येणार आहे.आज महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्दमध्य रेल्वे अंतर्गत जळगाव-भुसावळ मार्गावर अपग्रेडेशनचे कार्य करण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलै रोजी कोल्हापूरवरून निघणारी गाडी (११०३९) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द असल्यामुळे ही गाडी ८ जुलै रोजी गोंदियाला पोहोचणार नाही. त्यामुळे ९ जुलै रोजी गोंदिया स्थानकातून सुटणारी (११०४०) महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.सिकंदराबाद-दरभंगा गाडीचा विस्तारप्रवाशांच्या विशेष सुविधेसाठी सिकंदराबाद व दरभंगा दरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या परिचालनात विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी सिकंदराबाबवरून ०७००७ या क्रमांकाने ३१ जुलैपर्यंत चालणार होती. आता या विशेष गाडीच्या परिचालनात ३० आॅक्टोबर पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. तसेच विपरित दिशेतही दरभंगावरून (०७००८) ३१ जुलैपर्यंत धावणाºया विशेष गाडीच्या ३० आॅक्टोबरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे