शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

२९ ग्रा.पं.वर येणार प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वगळून गावातील कोणताही सज्जन व अनुभवी व्यक्तींची प्रशासक म्हणून निवड करावी असे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला फेब्रुवारीमध्ये प्रारंभ करण्यात आला होता. ग्रामपंचायत प्रभाग रचना, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षीत जागा निश्चित करण्यात आल्या.

ठळक मुद्देऑगस्ट महिन्यात संपणार कार्यकाळ : अनुभवी व्यक्तीची लागणार वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : येत्या ऑगस्ट महिन्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. शासनाने कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी २९ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वगळून गावातील कोणताही सज्जन व अनुभवी व्यक्तींची प्रशासक म्हणून निवड करावी असे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला फेब्रुवारीमध्ये प्रारंभ करण्यात आला होता. ग्रामपंचायत प्रभाग रचना, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षीत जागा निश्चित करण्यात आल्या.दरम्यान मार्च महिन्यात कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाला.त्यामुळे पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. गावपातळीवरील निवडणुका लांबणीवर गेल्या. येत्या ऑगस्टमध्ये तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यात माहुरकुडा, इसापूर, महागाव, बोंडगाव-सुरबन, केशोरी, देवलगाव, सावरटोला, बोरटोला, बोंडगावदेवी, सिलेझरी, बाराभाटी, कुंभीटोला, कवठा, तिडका, येगाव, जानवा, कोरंभीटोला, मांडोखाल, बोरी, प्रतापगड, झाशीनगर, परसोडी-रय्यत, पवनी-धाबे, करांडली, दिनकरनगर, भरनोली, इळदा, कन्हाळगाव, परसटोला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मुदतवाढ मिळणार या आशेवर ग्रामपंचायतचे पदाधिकारी होते. परंतु निवडणुक लांबणीवर गेल्याने आणि ग्रामविकास विभागाने प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिल्याने अनेकांची निराशा झाली आहे.मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार सबंधीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करण्यात येईल असे परिपत्रकात नमूद केले आहे.हालचालीला वेगपालकमंत्र्याच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याने तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. गावाचा प्रथम नागरिक बनण्याची सुवर्णसंधी कुणाला मिळणार याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.४ ग्रामपंचायतची मुदत नोव्हेंबरपर्यंततालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ऑगस्ट व नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे. यामध्ये २५ ग्रामपंचायत कार्यकाळ २ तसेच ३ ऑगस्टपर्यंत संपणार आहे. ईळदा, कुंभीटोला, महागाव, बोरटोला या ४ ग्रामपंचायतचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्तीचे परिपत्रक निघाल्याने तालुक्यातील सत्ताधाºयांच्या पदाधिकाऱ्यांनी सेटिंग लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत