लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.२९) आढळलेल्या एकूण ६ कोरोना बाधितांमध्ये देवरी येथील तीन जणांचा समावेश आहे. त्यामुळे तीन दिवसात येथील कोरोना बाधितांचा आकडा १७ वर पोहचला आहे. तर उर्वरित तीन रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी ४ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाले. यात गोंदिया तालुक्यातील भानपूर व रजेगाव येथील प्रत्येकी एक आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक व तिरोडा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी २२८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. बुधवारी कोरोना बाधित आढळलेल्या सहा रुग्णांमध्ये देवरी येथील तीन आणि गोंदिया तालुक्यातील कुडवा, मोरवाही आणि किडंगीपार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ८७७० स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी २६६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ८२०२ स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. २०८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.१०६ स्वॅब नमुन्यांबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.१४६२ नमुन्यांची रॅपिड अँटीजेन टेस्टकोरोना संशयित रुग्णांचा शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील १४६२ जणांचे नमुने घेण्यात आले. यात १४५४ अहवाल निगेटिव्ह आले.आठ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने १६६ चमू आणि ५८ सुपरवायझरची ३५ कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे.
सहा बाधितांची भर तर चार झाले मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST
कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाले. यात गोंदिया तालुक्यातील भानपूर व रजेगाव येथील प्रत्येकी एक आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक व तिरोडा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी २२८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.
सहा बाधितांची भर तर चार झाले मुक्त
ठळक मुद्देदेवरी येथील रुग्णांच्या संख्येत वाढ : कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २९ वर