शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'ऑनलाइन' प्रक्रियेकडे कानाडोळा करणाऱ्या ५७१ शाळांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:04 IST

शिक्षण विभागांकडून वांरवार सूचना : १० एप्रिलची डेडलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण विभागाच्या वतीने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासीत आराखड्याअंतर्गत सर्व शाळांनी आपल्या शाळेची 'ऑनलाइन' माहिती भरणे आवश्यक आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील ५७१ शाळांनी आपल्या शाळेची ऑनलाइन माहिती भरली नाही. यासाठी आता १० एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ९७.३२ टक्के शाळांनी ऑनलाइन माहिती भरण्याचे काम सुरू केले आहे. २.६९ टक्के शाळांनी माहिती भरण्यास सुरुवातच केली नाही. ६५.२७ टक्के शाळांची शंभर टक्के माहिती भरण्यात आली आहे. उर्वरित शाळांचे काम सुरू आहे. ही माहिती ऑनलाइन भरण्यासाठी आता १० एप्रिलपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. शाळांनी पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी केल्यानंतर शाळेची संपूर्ण १२८ मानकाची माहिती भरणे आवश्यक आहे. शाळेची गुणवत्ता वाढावी, शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शाळेचा एकूणच शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी 'स्कॉफ' या आराखड्याअंतर्गत माहिती भरली जात आहे. शाळांनी या आराखड्याअंतर्गत संपूर्ण माहिती भरून स्वयंमूल्यमापन केल्यानंतर बाह्यमूल्यमापन केले जाणार आहे. त्यानंतर शाळेचा दर्जा ठरविला जाणार आहे. बाह्य मूल्यमापन प्राथमिक शाळेसाठी ४५२ गुणांचे राहणार असून, माध्यमिक शाळेसाठी जवळपास ५०० गुणांचे राहणार आहे. १२८ मानकांपैकी ११३ मानकांची माहिती भरणे बंधनकारक आहे.

सर्व माहिती मानकात भरावी लागणारमैदानी खेळ, गणित विज्ञान मंडळ, वाचन विभाग, गणित साक्षरता मंडळ, कृती आधारित अध्यापन फोटो, शिक्षकांनी घेतलेले प्रशिक्षण, गुणवत्ता सुधारण्याकरिता नावीन्यपूर्ण प्रकल्प, वाचन कोपरा फोटो आदी सर्व माहिती शाळांना १२८ मानकांत भरावी लागणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी खासगी व शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृती करण्यासाठी गुणवत्ता मानके निश्चित करून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे. हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी होणारशाळांनी स्वयंमूल्यमापन केल्यानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी होणार आहे. या तपासणीत १५ टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असू नये. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याअंतर्गत शाळांना शाळेमध्ये झालेली चर्चासत्रे, पालक सभा, वार्षिक नियोजन, ऑनलाइन अभ्यास, विद्यार्थी अभ्यास करतानाचा फोटो, अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ टाचण, समग्र प्रगतिपत्रक, वृक्षारोपण, क्षेत्रभेट आदी साहित्य वापरतानाचा फोटो, किशोरवयीन विद्यार्थ्यांची कार्यशाळा, सर्व वर्गाचे वेळापत्रक फोटो, तसेच कला, संगीत व नृत्य नाटकाचा समावेश राहणार आहे.

"५७१ शाळांनी १० एप्रिलपर्यंत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याअंतर्गत आपल्या शाळेची सर्व माहिती ऑनलाइन भरून घ्यावी. काही अडचण असल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा."- सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :gondiya-acगोंदिया