गोंदिया : जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारु विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बिरसोला येथील भूजमल हरिश ठवरे (४०) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारु, बंसी सुखचरण कागदीउके (३५) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारु, शितूटोला येथील शांताराम गुजोबा टेकाम (४०) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संतोष काळे यांनी सावरीटोला येथील रामेश्वर भिकमचंद मंडीये (३२) याच्याकडून २४० नग देशी दारुचे पव्वे जप्त केले. कमरगाव येथील धनवंता धनराज दमाहे (४५) यांच्याकडून २ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. तिरोडा तालुक्याच्या बिरसी येथील गीता विजय सोनवाने (३५) या महिलेकडून ५ लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. खमारी येथील मातीराम टिकाराम वरखडे (५०) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, उदयटोला येथील आसिमा दिलीप उंदिरवाडे (४६) या महिलेकडून ४ लिटर हातभट्टीची दारू तर मलपुरी येथील गणेश शाहू मेश्राम (६२) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. बोंडगावदेवी येथील विकास रामप्रसाद बरैया (३२) याच्याकडून पाच नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोपीविरूध्द मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
विविध ठिकाणी दारू विक्रेत्यांवर कारवाई
By admin | Updated: March 12, 2017 00:25 IST