लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना त्यासंदर्भात संचारबंदी लागू करण्यात आली. सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी परवनागी न घेता आपले प्रतिष्ठाने उघडलीत त्यात ग्राहकांनी गर्दी केली. सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करण्यात आली. संचारबंदीचे उल्लंघन व नियमाचा भंग केल्यावरून एका कारखाना मालक व सहा दुकानदार अश्या सात जणांवर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सावराटोली येथील एका कारखाना जाणीवपूर्वक सुरू ठेवून २१ एप्रिल रोजी दुपारी १२.१५ वाजता दरम्यान त्याने कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी हे कृत्य केले. पोलीस नायक संतोष भेंडारकर यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया शहराच्या मजूर चौकातील इलेक्ट्री दुकानात सामाजिक अंतर न ठेवता २१ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता गर्दी करणाऱ्या आरोपीविरूध्द भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मजूर चौकातील कृष्णा हार्डवेअर नावाच्या दुकानात सामााजिक अंतर न ठेवता २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता लोकांनी गर्दी केली होती. त्या दुकान मालकावर भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लोहालाईन येथील आर. आर. गुप्ता हार्डवेअर दुकानासमोर सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करण्यात आली होती.या संदर्भात दुकानदारावर भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सिंधी कॉलनीतील मनुजा एजेन्सी (कॉस्मेटीक दुकान) समोर मोठ्या प्रमाणात २१ एप्रिलच्या सकाळी ११ वाजता कारवाई करण्यात आली. त्याच्या मालकावर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी गिफ्ट सेंटरच्या समोर देखील २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गर्दी करण्यात आली होती. त्या दुकान मालकावर भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सिंधी कालनीतील मनुजा एजेंन्सीसमोर २१ एप्रिल रोजी दुपारी १२.५० वाजता दरम्यान सामाजिक अंतर न ठेवता मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कारखान्याच्या मालकासह सात दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST