शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कुऱ्हाडीने घाव घालून पतीचा खून करणाऱ्या आरोपी पत्नीला आजन्म सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:59 IST

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : सदोष तपासामुळे एकाची निर्दोष

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : परपुरुषांशी संबंध ठेवून नवऱ्याला कुऱ्हाडीने घाव घालून ठार करणाऱ्या पत्नीला जिल्हा सत्र न्यायालयाने ३ ऑक्टोबर रोजी आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली. शारदा मुनेश्वर पारधी (वय २८) रा. बघोली असे आरोपी महिलेचे नाव आहे.

दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम बघोली येथील मुनेश्वर सहेसराम पारधी (वय ३२) या तरुणाला कुन्हाडीने घाव घालून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान ठार करण्यात आले. आरोपी शारदा पारधी हिचे गावातील कृणाल मनोहर पटले (२२) रा. बघोली याच्याशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून मुनेश्वर व कृणाल आणि शारदा यांच्यात वाद झाला होता. शारदाला कृणालसह पकडल्यामुळे कृणालवर विनयभंगाचा गुन्हा दवनीवाडा पोलिसात दाखल होता. 

हे प्रकरण ताजे असताना शारदाने आपल्या प्रियकराच्या प्रेमासाठी झोपेत असलेल्या नवऱ्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केला होता. या प्रकरणात दवनीवाडा पोलिसांनी शारदा मुनेश्वर पारधी (२८) व कृणाल मनोहर पटले (२२) दोन्ही रा. बघोली यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणाची ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करताना आरोपी शारदाला आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आले. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी काम पाहिले. 

१४ साक्षीदार तपासले मुनेश्वर सहेसराम पारधी (३२) यांच्या खुनाच्या प्रकरणात न्यायालयासमोर १४ साक्षीदार सादर करण्यात आले. त्या साक्षीदारांनी न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदविली. न्यायलयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी श्रीकांत मेश्राम यांनी काम पाहिले.

सदोष तपासामुळे कृणाल झाला निर्दोष या प्रकरणाचा तपास त्यावेळी ठाणेदार प्रताप भोसले यांनी केला होता. भोसले यांच्या सदोष तपासामुळे आरोपी कृणाल मनोहर पटले (२२) याला संशयाचा फायदा मिळाला अन् त्याची निर्दोष सुटका झाली.

"या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सदोष तपास केला होता. योग्य पुराव्याच्या आधारे आरोपीची निर्दोष मुक्तता करता येत नाही या आधारावर न्यायालयाने आरोपी शारदा पारधी हिला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे न्यायालयावरील जनतेचा विश्वास अजून वाढला आहे. "- कृष्णा पारधी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदिया