लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : वनविभाग (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र नवेगावबांध अंतर्गत चान्ना बाक्टी येथील एकाच्या घरात बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींना बुधवारी अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर करुन ५ आॅगस्टपर्यंत वनकोठडी घेण्यात आली.३० जुलैला बाक्टी रहिवासी आरोपी मंगेश नंदलाल बडोले याच्या घरुन बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. त्याच्यासह इतर दोन आरोपी विनोद जयगोपाल रुखमोडे रा.कटंगधरा सासरा जि. भंडरा व रविंद्र खुशाल वालदे रा.केसलवाडा सानगडी जि.भंडरा यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या तिन्ही आरोपींना अर्जुनी-मोरगाव येथील कनिष्ठ स्तर तालुका न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. पुढील तपासाकरिता वनकोठडीची वनविभागाच्यावतीने करण्यात आली.न्यायालयाने तिन्ही आरोपींना ५ आॅगस्टपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.अंधश्रद्धेला बळी पडून काळा जादू करुन पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तसेच संपत्ती मिळविण्याच्या लालसेपोटी हे कातडे घरात ठेवल्याची कबूली आरोपींनी प्राथमिक चौकशीत दिली होती. हे कातडे आपल्या मृतक आजोबाने आपणास दिल्याचे एक आरोपी विनोद रुखमोडे याने चौकशीत सांगितल्याची माहिती आहे.१९ डिसेंबर २०१८ ला केळवद शिवारात बिबट्याची अवैध शिकार करण्यात आली होती. त्यापुर्वीही वाघाच्या, बिबट्याच्या शिकारीचे अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकरणात आरोपीकडे हे बिबट्याचे कातडे कुठून आले? बिबट्याच्या शिकारीशी याचा काही संबंध आहे काय? याची चौकशी केली जात आहे.५ आॅगस्टपर्यंत तिन्ही आरोपींची वनकोठडीत घेण्यात आली असून चौकशी सुरु आहे. काळ्या जादूने पैशाचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने कातडे घरात ठेवल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तपासात लवकरच सत्य पुढे येईल.डी.एम.पाटीलपरिविक्षाधीन वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगावबांध
त्या आरोपींना सोमवारपर्यंत वनकोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:02 IST
वनविभाग (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र नवेगावबांध अंतर्गत चान्ना बाक्टी येथील एकाच्या घरात बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींना बुधवारी अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर करुन ५ आॅगस्टपर्यंत वनकोठडी घेण्यात आली.
त्या आरोपींना सोमवारपर्यंत वनकोठडी
ठळक मुद्देबिबट्याचे कातडे जप्ती प्रकरण : चान्ना बाक्टी येथील कारवाई