शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

नकली सोने विक्री करणाऱ्याचा खून करणारे आरोपी १६ की ३१?, नऊ जणांची तुरुंगात रवानगी

By नरेश रहिले | Updated: September 30, 2023 17:41 IST

त्याचा जीव घेणाऱ्या आरोपींसाठी, एमपीच्या झेडपी सदस्याची लुडबूड

गोंदिया : आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करीत किशोर चुन्नीलाल राठौर (३० ) रा. गोंडीटोला, कटंगीकला याचा खून करणाऱ्या आरोपींवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास डांगोर्ली येथे किशोर राठौरसह तीन तरुणांना बेदम मारहाण करीत मध्य प्रदेशात नेले. त्यांच्याकडून खंडणी मागून एकाचा जीव देखील घेतला. या प्रकरणात तब्बल ३१ आरोपी असल्याची खमंग चर्चा आहे. परंतु, रावणवाडी पोलिस आतापर्यंत फक्त १६ आरोपींची नावे स्पष्ट करू शकली. त्यातीलही आरोपींना अद्याप अटक करण्यात यश आले नाही.

१८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता डांगोर्ली येथे किशोर चुन्नीलाल राठौर (३०) रा. गोंडीटोला, कटंगीकला ता. जि. गोंदिया, संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८) रा. हनुमान मंदिरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला ह्या तिघांना बेदम मारहाण केली. ते तिघेही १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मोटारसायकलने किशोर राठौर यांच्याकडे असलेला नकली सोन्याचा झुमर विकण्याकरिता डांगोर्ली येथे गेले होते. आम्हाला नकली सोने विक्री करून आमची फसवणूक करता असे बोलून आरोपींनी त्या तिघांना मारपीट करून जबरीने आपल्या मोटारसायकलवर बसवून मध्य प्रदेशच्या डोंगरगाव येथे नेले. देवदीप जैतवार याच्या जवळील ५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. काठीने बेदम मारहाण केल्यामुळे यात किशोर राठौर याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३८६, ३४१, १४३, १४४, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या मारहाण करणाऱ्या आरोपींत ३१ जणांचा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यात १६ आरोपींची नावे स्पष्ट झाली आहेत. 

आरोपी ओमप्रकाश खिलेश्वर चौधरी (१८), अशोक ठाकरे (४०), अजय तुरकर (३५), शुभम ऊर्फ राजू दीपचंद ठाकरे (२३), आलोक बिसेन (२४, सर्व रा. कोसते, वाराशिवनी) यांना १९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रोहित भोरगडे (२८) व विजय भोरगडे (३५) या दोघांना २५ सप्टेंबर रोजी तर २७ सप्टेंबर रोजी दीपक भोरगडे (२६) व राजू क्षीरसागर (२५) या दोघांना अटक करण्यात आली. त्या नऊ आरोपींना न्यायालयाने भंडारा येथील तुरूंगात रवानगी केली आहे. पोलिसांना स्पष्ट झालेल्या नावांपैकी अजूनही सात आरोपी मोकाटच आहेत.

मध्य प्रदेशातील तो जि.प.सदस्य कोण?

नकली सोने विक्रीच्या नावावर तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या आरोपींच्या बचावासाठी मध्य प्रदेशातील एक जि.प. सदस्याने रावणवाडी पोलिस ठाणे गाठले. आपला तोरा दाखवून त्याने आरोपींची नावे कमी करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला. त्या दबावतंत्राला रावणवाडी पोलिस बळी पडत असल्याची चर्चा आहे. या घटनेला १३ दिवस होत असताना फक्त नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यामागील अर्थ काय?

खुनाच्या आरोपींना अटक करण्यासाठी रावणवाडी पोलिस गंभीर नसल्याचे दिसते. रावणवाडी येथील पोलिसांना आरोपींची माहिती असताना त्यांना अटक न करण्यामागील अर्थ काय? पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ३१ आरोपी असल्याचा कांगावा होत असताना १६ आरोपी पोलिसांनी दाखविले. त्यात त्यांना अटकही करण्यात आली नाही. या पोलिसांवर कुणाचा दबाव तर नाही अशी शंका व्यक्त केला जात आहे.

मिळतोय आरोपींना पुरावे गोळा करायला वेळ

या प्रकरणात समाविष्ट असलेले आरोपी त्या ठिकाणी नाहीत हे दाखविण्यासाठी आपण एखाद्या कार्यक्रमात होतो, दुसऱ्या ठिकाणी होतो असे बोगस पुरावे गोळा करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्या आरोपींना अभयदान देणारे कोण याचा तपास करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया