शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत कर्तव्यावर असतानाच शिक्षकाचा मृत्यू; आठ महिन्यापूर्वी झाले होते रुजू 

By अंकुश गुंडावार | Updated: December 13, 2025 23:43 IST

झुरकुटोला शाळेतील घटना, आंतरजिल्हा बदलीने झाले होते रुजू

गोंदिया : पंचायत समिती अंतर्गत डव्वा केंद्रातील झुरकुटोला येथील एक शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नितीन गोस्वामी (३८) यांचे शाळेतच कार्यरत असतांना शनिवारी (दि.१३) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. 

प्राप्त माहितीनुसार शनिवार सकाळी नेहमीप्रमाणे शिक्षक नितीन गोस्वामी हे काम करीत होते. दरम्यान ते कर्तव्यावर असताना अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. दरम्यान विद्यार्थ्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत शिक्षक नितीन गोस्वामी यांना बेशुद्ध अवस्थेत डव्वा येथील डाॅक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी शाळेत आणि गावात पसरताच दु:खाचे वातावरण निर्माण झाले. 

आठ महिन्यापूर्वी झाले होते रुजू 

शिक्षक नितीन गोस्वामी हे आंतरजिल्हा बदलीने आठ महिन्यापूर्वीच झुरकुटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रुजू झाले होते. त्यांनी शाळेत रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिले. असे शिक्षक ह्यापूर्वी आमच्या गावात आलेच नाही, असे गावाकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व विद्यार्थी व गावकर्‍यांनी दवाखान्यात शिक्षकाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

शिक्षक नितीन गोस्वामी हे  अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. विद्यार्थी व शाळेविषयी त्यांना आपुलकी होती. त्यांच्या निधनाने विद्यार्थी व गावकऱ्यात शोककळा पसरली आहे. - प्रशांत बालसनवार,सरपंच, पाटेकुर्रा.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher Dies on Duty in School; Joined Eight Months Ago

Web Summary : Nitin Goswami, a teacher in Zhurkutola, Gondia, died suddenly at school. He collapsed while working; villagers rushed him to a doctor, who declared him dead. He had joined the school eight months prior and was known for his dedication.
टॅग्स :Teacherशिक्षक