शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगारांच्या टोळीला 2 महिन्यांकरिता जिल्ह्याबाहेर केले तडीपार

By अंकुश गुंडावार | Updated: July 20, 2023 11:13 IST

गुन्हेगारांचे धाबे दणाणले

गोंदिया : पोलीस अधीक्षक यांचे आदेशानुसार तिरोडा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला 2 महिन्यांकरिता गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले.

 तिरोडा पोलिस ठाणे परिसरातील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख संजय सोवींदा बरीयेकर व त्याच्या टोळीविरुद्ध पोलीस ठाणे तिरोडा येथे मोहाफुलाची अवैध दारू गाळून विक्री करण्याचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार सवयीचे मगरुर व धाडसी प्रवृत्तीचे आहेत. या सर्वांच्या अवैध कृतीमुळे तिरोडा परीसरातील सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण झालेली असून लोकांचे सार्वजनिक स्वास्थ्यास धोका निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यांचेविरुद्ध उघड साक्ष देण्यास पुढे येत नाही.

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध वारंवार कारवाई करून सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. या गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्यांचेविरूद्ध पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तिरोडा यांनी त्यास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्फतीने मंजुरीस्तव सादर केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, उपविभागीय पोलिस यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून या गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.

या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, निखील पिंगळे, पोलीस यांनी मोहाफुलाची अवैध दारू गाळून विक्री करणारा टोळी प्रमुख सराईत गुन्हेगार नामे संजय सोविंदा बरियेकर, वय 35 वर्षे, रा.सिल्ली, त. तिरोडा यास व त्याचे टोळीतील सदस्य 1) निलेश्वरपुरी नागापुरी गांगदर्याव, वय 26, रा. सिल्ली, 2) दिगंबर आसाराम भलावी, वय 58 वर्षे, रा.बोरगाव, 3) स्वप्नील हंसराज मेश्राम, वय 31 वर्षे, रा.भिवापूर, 4) सत्यशील चिंधुजी बंसोड, वय 34 वर्षे, रा. ठाणेगाव, 5) अंकुश प्रकाश येशने, वय 23 वर्षे, रा.भूतनाथ वार्ड तिरोडा या सर्वांना 2 महिन्यांकरिता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचा हद्दपार आदेश पारीत केलेला आहे. उपरोक्त हद्दपार आदेश पोलीस ठाणे तिरोडा मिळाले आहे.गोंदिया जिल्हा पोलीस दलाने केलेल्या हद्दपार कारवाई मुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया