शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतात जाण्यासाठी मनाई केल्यामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या

By नरेश रहिले | Updated: May 8, 2023 18:22 IST

Gondia News देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील पोवारीटोला येथे राहणाऱ्या बळीराम जीवन बघेले (५५) या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी गावातीलच ६ जणांनी मनाई केली. या जाचाला कंंटाळून त्यांनी विष प्राशन करून १३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.

नरेश रहिलेगोंदिया : देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील पोवारीटोला येथे राहणाऱ्या बळीराम जीवन बघेले (५५) या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी गावातीलच ६ जणांनी मनाई केली. शासकीय कालव्याच्या जमिनीवर रस्ता होता, परंतु तो रस्ता आरोपींनी अतिक्रमणात घेतला आणि शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतची पाळी आणली. या अमानुष कृत्य करणाऱ्या पोवारीटोला शिलापूर येथील ६ जणांवर देवरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बळीराम जीवन बघेले (५५) रा. शिलापूर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. बळीराम बघेले यांची शेती शिलापूर येथील गट क्रमांक ४०१/१/ अ या शेतावर ते वर्षानुवर्षांपासून शासकीय कालव्याच्या पाळीने जात होते. शासकीय कालव्याची पाळ रस्ता म्हणून ते वापरत होते. परंतु आरोपी नेपालचंद महादेव टेंभरे (६६) व उमेश नेपालचंद टेंभरे रा. देवरी यांनी त्या रस्त्यावर अतिक्रमण करून त्यांना शेतावर जाण्यासाठी मनाई केली. त्या शासकीय पाळीवर आरोपींनी अतिक्रमण केल्यामुळे बळीराम यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे त्यांनी तळ्याच्या वाळीवरून नवीन रस्ता तयार केला आणि येणे जाणे सुरू केले. परंतु या नवीन रस्त्यावरूनही आरोपी रामचंद्र अंताराम बोपचे (६५), सुनील रामचंद्र बोपचे (३०), प्रदीप रामचंद्र बोपचे (२८) व दिलीप रामचंद्र बोपचे (३३) सर्व रा. पोवारीटोला शिलापूर यांनीसुद्धा या रस्ता अडवून त्यांना या ठिकाणातून येणे-जाणे करण्यास मनाई केली.

पारंपरिक माझी शेती असून मला शेतात जाण्यास जागा नाही, आरोपी त्यांच्याशी वारंवार वाद घालत होते. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या जाचाला कंंटाळून बळीराम बघेले यांनी विष प्राशन करून १३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. या घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाच्या तपास पोलिस हवालदार ज्ञानीराम करंजेकर यांनी केला आहे. चौकशीत हे सहा लोक आरोपी निष्पन्न झाल्याने त्या आरोपींवर ७ मे रोजी भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याCrime Newsगुन्हेगारी