गोरेगाव :गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला येथील एका शेतशिवारातील एका झाडावर अस्वल झाडावर अस्वलाने आसरा घेतला असल्याची घटना शनिवारी (दि.२८) दुपारी उघडकीस आली. महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांना ही अस्वल झाडावर बसून असल्याचे आढळले.
त्यानंतर याची माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना होताच त्यांनी अस्वलाला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. हे शेत महामार्गालत असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांनी देखील अस्वल पाहण्यासाठी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली असून अस्वलीला रेस्क्यू करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.