शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

८१ हजार अंत्योदय शिधापत्रिकांवर मिळणार मोफत साडी

By कपिल केकत | Updated: January 29, 2024 19:52 IST

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी गिफ्ट : होळीपर्यंत करावयाचे आहे वितरण

गोंदिया: अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना शासनाच्या माध्यमातून आता दरवर्षी प्रत्येकी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ८१ हजार ४८२ अंत्योदय शिधापत्रिकांवर ही साडी स्वस्त धान्य दुकानांत दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. आता या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ साड्यांचे गठे जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकांच्या यादीनुसार प्रत्येक तालुक्यातील रास्तभाव दुकानांच्या नावानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुकास्तरावरील गोदामात पोहोचविणार आहे.

जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.

------------------------

प्रत्येकी ३५५ रुपयांची साडी मोफत- शासनाच्या निर्णयानुसार महामंडळ ३५५ रुपयांप्रमाणे साडीची खरेदी करणार आहे. २०२३-२४ या वर्षासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी ३५५ रुपयांप्रमाणे साडीची खरेदी होणार आहे. तथापि, महामंडळाला हा सारा खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे.------------------------------

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र- राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी मोफत वितरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दि. २३ जानेवारीला पत्र देण्यात आले आहे.

-----------------------------दरवर्षी मिळणार एक साडी

- महिलांना दरवर्षी एक साडी मोफत मिळणार असून, साडीचे वितरण रास्तभाव दुकानदारांच्या माध्यमातूनच केले जाणार आहे. म्हणजेच आता रेशन दुकानावर फक्त अन्नधान्यच मिळणार नसून, अन्नधान्यासोबतच साडीचेदेखील वितरण होणार आहे.

-------------------------प्रजासत्ताक दिनापासून होळीपर्यंत वितरण

- या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या साडीचे वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनापासून ते होळी सणादरम्यान अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी याप्रमाणे याचे वितरण लाभार्थींना केले जाणार आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप साडी आलेली नाही.--------------------------

- राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार रास्तभाव दुकानातून अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी वितरित केली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी होळीच्या सणापर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळाली.--------------------------------

कोणत्या तालुक्यात किती अंत्योदय शिधापत्रिकाआमगाव- ८,६६०

अर्जुनी-मोरगाव- १०,८३७देवरी-८,७७८

गोंदिया- १६,०३५गोरेगाव- ९,७३६

सडक-अर्जुनी- ८,७०५सालेकसा- ७,५८९

तिरोडा- ११,१४२

टॅग्स :gondiya-acगोंदिया