शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

मत्स्य व्यवसायातून आठ हजार कुटुंबांना आधार

By admin | Updated: September 23, 2015 05:28 IST

मालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय उत्तमरित्या वाढत आहे. हा मत्स्यपालन व्यवसाय

देवानंद शहारे ल्ल गोंदियामालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय उत्तमरित्या वाढत आहे. हा मत्स्यपालन व्यवसाय आठ हजार कुटुंबांसाठी आधार बनला आहे. मत्स्य व्यवसाय व मत्स्य उत्पादनाबाबत गोंदिया जिल्हा चंद्रपूरनंतर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागात अनेक महत्त्वपूर्ण पदे रिक्त असतानाही जिल्ह्यात मत्स्य व्यवसायातून मागील वर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. जिल्ह्यात १३३ नोंदणीकृत मत्स्यमार सहकारी संस्था आहेत. यापैकी १२६ संस्था कार्यरत आहेत. ९ हजार १५० सभासद (पारंपरिक मत्स्यमार) यापैकी ८ हजारांच्या जवळपास मत्स्यमार क्रियाशील आहेत. जिल्ह्यात या व्यवसायासाठी ६ हजार ९०५ तलाव, बांध आहेत. एकूण जलक्षेत्र २१ हजार ५०९ हेक्टर आहे. यापैकी १६ हजार ३२६ हेक्टरमध्ये मत्स्यपालन केले जात आहे. सिंचन विभागाच्या ६६ तलावांचे जलक्षेत्र ११ हजार हेक्टरच्या जवळपास असून जिल्हा परिषदेच्या एक हजार ८७ तलावांचे जलक्षेत्र चार हजार ६५४ हेक्टर आहे. याशिवाय ८८ खासगी व पाच बचत गटांचे तलाव आहेत. यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस न आल्यामुळे ६२९ लाख मत्स्य जीरे अमरावती व नागपूर जिल्ह्यास विक्री करावे लागले. येथील माशांची बालाघाट, नागपूर व हावडा येथे निर्यात केली जाते. पाचव्या वर्षी कंत्राट मालगुजारी तलावांत मत्स्य पालनासाठी मत्स्यमार सहकारी संस्थेला कंत्राट दिले जातात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त, जिल्हा मत्स्यमार संघाच्या सिफारसीवर सिंचन विभागाचे तलाव जिल्हा परिषदेद्वारे पाच वर्षांसाठी कंत्राटावर दिले जातात. संस्थेकडून दरवर्षी कंत्राटाची रक्कम वसुली करण्यात येते. मत्स्य पालनासाठी देण्यात येणारे अनुदानाचे दरसुद्धा जुने आहेत. त्यामुळे मत्स्य व्यवसाय प्रभावित होत आहे. या संदर्भात राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्ताद्वारे गोडे पाण्याचे मासे पकडण्यासाठी नाव (होडी) अनुदान वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमगाव उपकार्यालय बंदजिल्हा मत्स्य विभागात चार पदे रिक्त होते. यापैकी एक पद भरण्यात आले आहे. सहायक आयुक्ताचे पद रिक्त आहे. आमगाव उपकार्यालयात सहायक मत्स्यविकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे हे कार्यालय बंद पडून आहे. याशिवाय मत्स्य बीज केंद्र इटियाडोह, मत्स्य बीज केंद्र अंभोरा येथे फील्ड मॅनच्या दोन जागा रिक्त आहेत. मासेमारांसाठी विविध योजना पारंपरिक माासेमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाद्वारे विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नवीन तलावांत विभागाच्या माध्यमातून पाच वर्षे मोफत मत्स्यबीजांचा साठा केला जातो. नाव आदी साहित्यांवर ५० टक्के किंवा ३० हजार रूपयांपर्यंत अनुदान दिले जाते. दारिद्र्यरेषेखाली येणाऱ्या मत्स्यमारांना आवास बांधकामासाठी ४० हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास एक लाख रूपये अपघात विमा, अपंगत्वासाठी ५० हजार रूपयांची सहायता यासह अनेक योजना आहेत. नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये मत्स्यमारांशी संपर्कासाठी दोन वाहनांची गरज आहे, पण सध्या एकही वाहन उपलब्ध नाही. सामाजिक दृष्टिकोनातून मागास, दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना व महिलांना सक्षमीकरणाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील मत्स्यबीज मार्केटमध्ये उपलब्ध व्हायला हवे. मत्स्य व्यवसाय संस्थेचा कोणताही सभासद मत्स्य उत्पादनासाठी कार्यालयाशी संपर्क करू शकतो.-समीर परवेज,सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, गोंदिया.तलावांमध्ये पाणी राहात नाही. मोटार पंपद्वारे सिंचनासाठी पाणी घेतले जाते. तलावातून उपयुक्त पाणीच सिंचनासाठी घेतले जावू शकते. परंतु डेड वॉटर (मृत साठा) कमी होत आहे. पंचायत समितीमध्ये पैसा भरल्यानंतरही अशी स्थिती आहे. -टंटू मोडकू मेश्रामअध्यक्ष, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, भडंगा.