लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रेमापोटी व जिद्दीपुढे नमून आपल्या अल्पवयीन अपत्यांना पालक वाहन देत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन वाहनचालकांची संख्या शहरात वाढत जात आहे. अशा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली आहे. शाखेने १ ते २३ तारखेदरम्यान सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे.विद्यार्थी शिक्षणाच्या बोजाखाली दबला जात आहे. शाळेतील अभ्यास व त्यानंतर ट्यूशन अशा धावपळीत आजची पिढी अडकली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असून यातून बाहेर पडायसाठी विद्यार्थ्यांना वेळ नसून रात्री ते पार थकून जातात. अशात आपल्या अपत्यांना थोडा आराम मिळावा या दृष्टीने पालक शाळा व ट्यूशनसाठी त्यांना दुचाकी घेऊन देत आहेत. अशात मात्र एकाचे बघून दुसऱ्यालाही वाहन घेऊन देण्याचे प्रकार एवढे वाढले आहे की, मोठ्यांच्या बरोबरीने आज अल्पवयीन मुले-मुली वाहन चालविताना दिसतात.विशेष म्हणजे आपल्या मुला-मुलींप्रती असलेल्या प्रेमातून तर काही ठिकाणी मुलांच्या जिद्दीतून पालक त्यांना वाहन देत आहेत. मात्र त्यांच्या हातून नियम तूटत असून हाच प्रकार पुढे त्यांच्या व त्यांच्या मुला-मुलींच्या अंगलट येऊ शकतो याचे भानही त्यांना राहत नाही. हे अल्पवयीन मुले-मुली फर्राट वेगाने वाहन चालवित असून यातूनच आता अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहेत. या प्रकारावर आळा बसावा यासाठी येथील वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच अल्पवयीनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम छेडली आहे.वाहतूक नियंत्रण शाखेने १ ते २३ नोव्हेंबर दरम्यान ६७५ वाहनचालकांवर कारवाया केल्या आहेत. त्यात, ९८ कारवाया वाहन परवाना नसलेल्यांच्या असून त्या सुमारे ८० कारवाया अल्पवयीन वाहनचालकांच्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया २१ तर ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांच्या ८७ कारवाया आहेत.सध्या ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र यात नक्कीच वाढ होणार यात शंका नाही.५४ पालकांनीभरला दंडवाहतूक नियंत्रण शाखेने सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यांतर्गत वाहतूक पोलीस त्या अल्पवयीन वाहनचालकांना सोडून देतात व त्यांना पालकांना पाठविण्यास सांगतात. अशात आतापर्यंत ५४ पालकांनी त्यांच्या अपत्यांच्या चुकीचा ४२ हजार ५०० रूपयांचा दंड भरल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पालकांना बोलावून त्यांना आपल्या अल्पवयीन अपत्यांना वाहन देण्याचे दुष्परिणाम भविष्यातील धोका याबाबत वाहतूक शाखेचे नियंत्रक तायडे मार्गदर्शन करीत आहेत.
८० अल्पवयीन वाहनचालकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST
शाखेने १ ते २३ तारखेदरम्यान सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या बोजाखाली दबला जात आहे. शाळेतील अभ्यास व त्यानंतर ट्यूशन अशा धावपळीत आजची पिढी अडकली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असून यातून बाहेर पडायसाठी विद्यार्थ्यांना वेळ नसून रात्री ते पार थकून जातात.
८० अल्पवयीन वाहनचालकांना दणका
ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेने छेडली मोहीम : २३ दिवसात एकूण ६७५ कारवाया