शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जिल्ह्यात आणखी ८ कोविड केअर सेंटर होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून धक्कादायक बाब म्हणजे, आता ३ अंकी संख्या सुरू झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांचे अलगीकरण करण्याची गरज आहे. 

ठळक मुद्दे८ इमारतींचे केले अधिग्रहण : मंगळवारपासून होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता आरोग्य विभागाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. यांतर्गत आता रुग्णांची सोय व्हावी म्हणून आणखी ८ कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असून त्यासाठी ८ इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रत्येकच तालुक्यात हे कोविड केअर सेंटर देण्यात आले असून मंगळवारपासून हे सेंटर्स सुरू होणार आहेत. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून धक्कादायक बाब म्हणजे, आता ३ अंकी संख्या सुरू झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांचे अलगीकरण करण्याची गरज आहे. अशात कोविड केअर सेंटर वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच आरोग्य ‌विभागाने जिल्ह्यात आणखी ८ कोविड केअर सेंटर प्रस्तावित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे या ८ कोविड केअर सेंटरसाठी ८ इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले असून प्रत्येकच तालुक्यात हे कोविड केअर सेंटर देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच असल्याने सर्वाधिक भार गोंदिया शहरातच पडत आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभागाने लगतच्या ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे अधिग्रहण करून तेथील सेंटर सुरू केले होते. याचा फायदा मिळत असून आडघडीला तेथे २६ बाधितांना हलविण्यात आल्याची माहिती आहे. त्यात आता आणखी ८ कोविड केअर सेंटर सुरू होतील. त्यातही प्रत्येकच तालुक्यात १ कोविड केअर सेंटर देण्यात आल्याने नक्कीच त्या तालुक्यातील रुग्णांची तेथे सोय करता येणार आहे. मंगळवारपासून हे सेंटर्स सुरू होणार आहेत. 

येथे होणार कोविड केअर सेंटर  जिल्ह्यात आणखी ८ कोविड केअर सेंटर सुरू होणार असून यासाठी इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया शहरातील जिल्हा क्रीडा संकुल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील जिल्हा परिषद शाळा तसेच आदिवासी मुला-मुलीचे शासकीय वसतिगृह (नवीन इमारत), देवरी तालुक्यात देवरी येथील शासकीय विश्रामगृह, सालेकसा तालुक्यात शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम केसलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथील अनुसूचित नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, तर आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील आरोग्य उपकेंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात बिरसी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. माविम करणार रुग्णांच्या जेवणाची सोय  कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांच्या जेवणावरून मागील वर्षी चांगलेच वादंग झाले होते. यात एका कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. हा प्रकार यंदा घडू नये यासाठी यंदा कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या जेवणाची सोय महिला आर्थिक विकास महामंडळाकडून केली जाणार आहे. यासाठी माविमला कंत्राट देण्यात आले असून तसे ऑर्डर देण्यात आले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या