शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘त्या’ अपहारातील ७६ लाख २१ हजार जप्त

By admin | Updated: June 16, 2014 23:34 IST

देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून ७६ लाख २१ हजार ६०० रूपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.

गोंदिया : देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून ७६ लाख २१ हजार ६०० रूपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.देवरी तहसील कार्यालयातील नामदेव शंकर बुटे व अव्वल कारकून सुनिल खुशाल वैरागडे या दोघांना अटक करण्यात आली. देवरी पोलिसांनी या दोघांची चौकशी केल्यावर अव्वल कारकून सुनिल वैरागडे याच्या घरी धाड घालून ७१ लाख ५० हजार रूपये मंगळवारच्या रात्री ९.४५ वाजता जप्त केले. त्यानंतर बुधवारच्या सकाळी तहसिल कार्यालयातील सुनिल वैरागडे याच्या टेबलच्या ड्राव्हरमधून १४ हजार रूपये, व त्याच्या घरून ७ हजार ६०० रूपये जप्त करण्यात आले. नामदेव शंकर बुटे या नाझर कडून चार लाख ५० हजार रूपये ज्पत करण्यात आले. बुटे देवरी येथील पिंपळकर यांच्या घरी भाड्याने राहात होता. त्या घरमालकाला २ लाख रूपये देऊन ठेवले होते. तर अडीच लाख रूपये देवरी येथील भाड्याच्या खोली शेजारी राहणाऱ्या श्रीमती मेश्राम यांना देऊन ठेवले होते. ही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या दोन्ही आरोपींच्या खात्यातून रक्कम काढली जाऊ नये यासाठी पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे सर्वच खाते गोठविलेले आहेत. बुट्टे यांनी आपल्या परभणी व नांदेड येथील नातेवाईकांना पैसे देऊन ठेवले. त्यामुळे तेथील पैसे हस्तगत करण्यासाठी मागील तीन दिवसापासून देवरी येथील एक पथक रवाना झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व त्यांच्या सोबत चार कर्मचारी मागील तीन दिवसापासून रवाना झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत घोळ कितीचा झाला याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या रकमेचा आॅडीट झाल्यावरच नेमका कितीचा अपहार आहे याची माहिती समोर येणार आहे. या प्रकरणात बॅकेच्या अधिकाऱ्यांचा तर समावेश नाही ना अशी विचारणा केल्यावर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात तपास सुरू असल्याचे सांगितले. परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे किंवा नाही या पश्नावर पोलीस निरूत्तर राहीले. या आरोपींना न्यायालयाने १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात आरोपींकडून अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.(तालुका प्रतिनिधी)