शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:11 IST

नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.

ठळक मुद्देएक वर्षाच्या आतील ६९३ बालके : बालमृत्यू थांबता थांबेना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.शासन मातामृत्यू व बालमृत्यूची संख्या शुन्यावर आणण्यासाठी विविध योजना अमंलात आणत आहे. परंतु या योजनांच्या अमंलबजावणीत कुचराही होत असल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील जनता आरोग्यासंदर्भात अत्यंत उदासिन आहे. गर्भवती किंवा बाळंतीन यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यूचा आकड्यात दरवर्षी वाढ होत आहे.मागील दोन वर्षातील बालमृत्यूचा आढावा घेतला असता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ०-१ वर्षातील ३९५ बालके तर १ ते ५ वर्षातील १९ अशा ४१४ बालकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील बालमृत्यूची आकडेवारी कमी झाली आहे. वर्षात ०-१ वर्षातील २९८ बालके तर १ ते ५ वर्षातील ४३ अश्या ३४१ बालकांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू झाला आहे. उपकेंद्रापासून जिल्हा रूग्णालयापर्यंत रूग्णांच्या सेवेसाठी यंत्रणा जरी असली तरी याच यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महिला गर्भवती झाल्यापासून तिच्या प्रसूती होऊन पाच वर्षापार्यंत बाळाची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर इतरही यंत्रणा असल्या तरी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. बालमृत्यूची आकडेवारी फुगने ही बाब आरोग्य विभागासाठी मंथन करायला लावणारी आहे.गर्भवतींकडे व नवजात बालकांच्या संगोपणाकडे होणारे दुर्लक्ष हे बालमृत्यूचे आकडे फुगवत आहेत.उमलण्यापूर्वीच १५७ कळ्या कोमेजल्यामहिलांची गर्भावस्थेत कुटुंबातील लोक पाहिजे तशी विशेष काळजी घेत नसल्यामुळे हे जग पाहण्याच्या पूर्वीच १५७ कोवळ्या कळ्या कोमेजल्या आहेत. सन २०१७-१८ या वर्षात १५१ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. तर सन २०१८-१९ या वर्षात १०६ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. अत्यल्प कमी वजनाची जन्माला आलेली बालके कुपोषणामुळे मृत्यूच्या दाढेत जात आहेत. परंतु महिला व बालकल्याण विभाग या मृत्यूला कुपोषणाने मृत्यू झाल्याचे दाखवित नाहीत.गर्भातच वाढतेय कुपोषणगर्भवती महिलांना गर्भावस्थेत संतुलीत आहार देणे आवश्यक असतांना महिलांच्या दररोजच्या जेवणातून वरण हद्दपार झाला असतो. कडी, आळण किंवा वांग्याची भाजी यावरच त्यांचे दररोजचे जेवण असल्यामुळे बाळाला पोषण मिळत नाही. त्यातच गर्भावस्थेतही ग्रामीण भागात राहणारी महिला खूप कष्ट करते आणि पोटाला संतुलीत आहारही मिळत नाही. त्यामुळे पोटातच तिच्या बाळाची वाढ होत नाही. वाढ झाली तरी ती अत्यल्प प्रमाणात असते.असंतुलीत आहारामुळे कमी वजनाची बालके जन्माला येतात. त्यामुळे कमी वजनाच्या बालकांचा पोटातच किंवा जन्म घेतांना मृत्यू होतो. असंतुलीत आहारामुळे गर्भाची वाढ होत नाही त्यात व्यंगता येते परिणामी अर्भक मृत्यूदर वाढतो.