शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:10 IST

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.

ठळक मुद्देतलाव पडले कोरडे : मासेमारी व्यवसाय डबघाईस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.त्यामुळे कोट्यवधीे रुपयांचा व्यवसाय संकटात आला असून यावर अवलंबून असणाऱ्या ७ हजारावर कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो.मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असल्याने पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून तलाव कोरडे पडत आहे. तलावातील पाणी कमी आणि वाढत्या उष्णतामानामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थांना सुध्दा आर्थिक फटका बसला असून यावर आधारीत कुटुंंब देखील संकटात आल्याचे चित्र आहे.तलावांच्या खोलीकरणाचा अभावशासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत सुध्दा घट होत आहे. तलावांचे खोलीकरण झाले असते तर तलावात काही प्रमाणात पाणी साचून राहिले असते त्याची मत्स्यपालन संस्था आणि शेतकऱ्यांना सुध्दा मदत झाली असती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.तलावांवर वाढले अतिक्रमणजि.प.आणि सिंचन विभागाच्या मालकीचे जिल्ह्यात सहा हजारावर तलाव आहेत. मात्र यांच्या देखभाल दुरूस्तीकडे या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे तलाव लगतच्या शेतकºयांनी तलावावर अतिक्रमण करुन तलावाचे क्षेत्र कमी केले आहे. परिणामी तलावाचे सिंचन क्षेत्र कमी होत असून याचा पाहिेजे तसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.भूजल पातळीवर परिणामतलावातील गाळाचा उपसा न केल्याने सिंचन क्षमतेत घट होत आहे.तर उन्हाळ्याच्या दिवसात लवकरच तलाव कोरडे पडत असल्याने त्याचा भूजल पातळीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार