शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

ठाणेदार असल्याचे सांगून हॉटेल मालकाला ब्लॅकमेल करीत उकळले ६० हजार; अश्लील व्हिडीओ केला तयार

By नरेश रहिले | Updated: November 6, 2023 20:14 IST

यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द तक्रार केली आहे.

गोंदिया: शहरातील हॉटेल राईस सिटी लॉजींग येथे अश्लील व्हीडीओ तयार करून स्वत: ठाणेदार असल्याचे सांगून हॉटेल मालकाला तब्बल ६० हजाराने लुटल्याची घटना ४ व ५ नोव्हेंबर रोजी घडली. यासंदर्भात हॉटेल मालक गोपाल प्रल्हादराव अग्रवाल (६६) रा. अशोक कॉलनी गणेशनगर यांनी यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द तक्रार केली आहे.

यासंदर्भात गोपाल अग्रवाल यांनी गोंदिया शहर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीने ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:१५ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन करून आपण हॉटेल राईस सिटीचे मालक बोलत आहात का? तुमच्या हाौटेलमध्ये मागील काही दिवसापूर्वी नागपूर येथील मुलगा-मुलगी थांबले होते. त्या मुलाने त्या मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार करून व्हायरल केला. त्यानंतर त्या मुलीसोबत चार-पाच लोकांनी कुकर्म केल्याने यासंदर्भात नागपुरात चार्जशीट पाठवायचे आहे. ती व्हिडीओ तयार करण्यासाठी तुम्ही मदत केली म्हणून तुमचे नाव टाकत आहे. यात तुम्ही सहआरोपी होणार अशी धमकी दिली. त्या चार्जशीट म्हणून तुमचे नाव काढायचे असेल तर तर तुम्ही आमचे ठाणेदार शर्मा यांच्या बोला असे बोलून त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. 

त्याने नाव काढण्यासाठी पोलीस प्रोसेक्युटरला पैसे द्यावे लागतील यासाठी ४० हजार रूपयाची मागणी केली. अग्रवाल यांनी भितीपोटी ४० हजार रूपये फोन पे वर ट्रान्सफर केले. पुन्हा सकाळी १०:५८ वाजता फोन करून पोलीस प्रोसेक्युटर ४० हजारात मानत नाही आणखी २० हजार रूपये पाठवा असे सांगितले. भितीपोटी दुपारी १२.०७ वाजता पुन्हा २० हजार रूपये त्यांना पाठविले. २० हजार रूपये त्यांनी त्यांचा नोकर अमित हेमने याच्या फोन पे वरून पाठविले होते. ६० हजार रूपये उकळूनही त्यांना वारंवार फोन करून फोन करून त्रास देणाऱ्या अज्ञात आरोपीवर गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ४१९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वानखेडे करीत आहेत. कोणताच गुन्हा दाखल नसतांना आरोपींनी केली फसवणूकगोंदियाच्या राईस सीटी हॉटेलात अश्लील व्हिडीओ तयार झाल्याचा कसलाही गुन्हा नसतांना तोतया ठाणेदाराने बनवाबनवी करून गोपाल अग्रवाल यांना ६० हजाराने गंडविले. अग्रवाल यांच्या हॉटेलच्या नावावर चुकीचा संदेश पसरल्याची खोटी माहिती देऊन त्यांना लुबाडणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु ज्या फोन पे वर पैसे ट्रान्सफर करण्यात आले तो क्रमांक रवि मंचावर नागपूर याचा असल्याचे दाखविते.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी