शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

देशात ६० टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजाराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 21:53 IST

असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो.

ठळक मुद्देहिम्मत मेश्राम : असंसर्गजन्य रोग तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे कित्येक रु ग्णांना मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्वाला सामोरे जावे लागते. यासाठी सर्व जनतेने सहा महिन्यांतून एकदा रक्तदाब व रक्तशर्करेची तपासणी करावी. कारण, देशात ६० टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजाराने होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी सांगीतले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र म व असंसर्गरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.३) केटीएस रुग्णालयात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजीत असंसर्गरोग तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोहन घुगे होते. याप्रसंगी डॉ. रवी लावनकर, डॉ. दीपक बाहेकर, डॉ. मोहबे, डॉ. शैलेश कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचे कोणतेही पूर्वलक्षण नसताना हृदयाच्या झटक्याने (असंसर्गजन्य रोगाने ) अचानक दु:खद निधन झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. लावनकर यांनी, अचानक एखाद्या व्यक्तीस हृदयाचा झटका आल्यास किंवा हाताची नाडी व हृदयाचे ठोके न लागल्यास दोन्ही हाताने हृदयावर मिनिटाला कमीत कमी १०० वेळा दाब देऊन व तोंडाने प्राणवायू देऊन वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत रु ग्णास जिवंत ठेऊ शकतो असे सांगीतले. तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. बाहेकर यांनी, उच्चरक्तदाब किंवा मधुमेह कुणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. यापासून बचाव करायचा असल्यास दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम, फळांचे जास्त सेवन, तेलकट-तळलेले पदार्थ, मीठ, मांस कमी खाणे, व्यसन व मानसिक तणावापासून दूर राहिल्यास असंसर्गजन्य रोगापासून दूर राहू शकतो असे सांगीतले. डॉ. मोहबे यांनी, असंसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी व ते होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. डॉ. कुकडे यांनी, तंबाखूचे सेवन केल्याने हृदयाची वारंवार गत वाढून पुढे हृदयाचे आजार व कर्करोग सुद्धा होतो असे सांगीतले. शिबिरासाठी डॉ. मनोज राऊत, डॉ. अनिल आटे, डॉ. शुक्ला, संजय बिसेन, आर. बी. एस. के. चे डॉक्टर , नर्स, फार्मासिस्ट, एन. यु. एच. एम. चे डॉक्टर आणि नर्स, मेंटल हेल्थ टीम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण टीम. एस. डी. एच. तिरोडा येथील टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टीमने सहकार्य केले.९१ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीसदर तपासणी शिबिरात एकूण ९१ कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ७० पुरु ष व २१ स्त्री कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी १० कर्मचाऱ्यांची रक्तशर्करा व २० कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढलेला आढळला. तसेच ५९ ईसीजी तपासणी पैकी तीन कर्मचाऱ्यांच्या ईसीजी मध्ये बदल आढळून आला.

टॅग्स :Healthआरोग्य